- तथाकथित ‘निधर्मी’ भारत निधर्मी चीनकडून आतंकवादी आणि आतंकवादी संघटना यांच्या विरोधात कशी कृती करायची हे शिकेल का ?
- पंतप्रधान मोदी यांच्या सरकारने तरी गेल्या ५ वर्षांत असे कार्य केले आहे का ?
- काँग्रेसने तरी त्याच्या कार्यकाळात असे कार्य केले होते का ? उलट काँग्रेसमुळेच देशात जिहादी आतंकवाद निर्माण होऊन भारतभर फोफावला !
- चीनमधील निधर्मी कम्युनिस्ट जिहादी आतंकवाद्यांना संपवण्याचा प्रयत्न करतो, तर भारतातील कम्युनिस्ट जिहाद्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतात !
- एकीकडे चीन स्वतःच्या देशातील जिहादी आतंकवाद्यांवर कारवाई करतो, तर दुसरीकडे भारतात आतंकवादी कारवाया करणार्या जैश-ए-महंमदच्या मसूद अझहर याला पाठीशी घालतो !
बीजिंग : चीनने वर्ष २०१४ पासून आतापर्यंत त्याच्या शिनझियांग प्रांतातील १२ सहस्र ९९५ जिहादी आतंकवाद्यांना अटक करून त्यांच्या सुमारे १ सहस्र ५९९ आतंकवादी टोळ्या नष्ट केल्याची माहिती चीनकडून देण्यात आली आहे. ‘मानवी हक्कांचे संरक्षण, तसेच कट्टरपंथीय आणि आतंकवादाविरोधात लढा’ असे याविषयी चीनने काढलेल्या श्वेतपत्रिकेत म्हटले आहे. यात चीनने या प्रांतातील मुसलमानांसाठी राबवल्या जाणार्या सुरक्षा उपाययोजनांचे समर्थन केले आहे. या प्रांतातील सुमारे १० लाख मुसलमानांना छावाण्यांमध्ये ठेवले आहे. या सूत्रावरून आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याच्यावर टीका होत आहे. (आंतरराष्ट्रीय टीकेला भीक न घालता मुसलमानांमधील धर्मांधता नष्ट करण्यासाठी कठोर पावले उचलणार्या चीनकडून जन्मभर अल्पसंख्यांकांच्या लांगूलचालनाचे राजकारण करणारे भारतीय शासनकर्ते काही शिकतील का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
१. चीनने म्हटले आहे की, या मुसलमानांना ज्या ठिकाणी ठेवण्यात आले आहे तेथे त्यांना व्यवसाय शिक्षण दिले जाते. उपजिविकेसाठी त्यांना प्रशिक्षण देण्यात येते. तसेच कट्टरपंथीय विचाराच्या प्रभावातून बाहेर काढण्याचे काम चालते. (असे आहे, तर भारतानेही चीनचे अनुकरण करायला काहीच अडचण नाही; कारण चीनपेक्षा जिहादी आतंकवाद आणि धर्मांधता याचा सर्वाधिक त्रास भारत गेली अनेक शतके भोगत आहे ! कुठे धर्मांधता नष्ट करण्यासाठी प्रयत्न करणारे चीनचे शासनकर्ते, तर कुठे धर्मांधतेचे शिक्षण देणार्या मदरशांना अनुदान देणारे भारतातील शासनकर्ते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
२. अटक करण्यात आलेल्या आतंकवाद्यांकडून २ सहस्र ५२ स्फोटक उपकरणे जप्त केली आहेत. तसेच ३० सहस्र ६४५ लोकांना शिक्षा केली आहे. अवैध धार्मिक साहित्याच्या ३ लाख ४५ सहस्र २२९ प्रती जप्त केल्या आहेत, अशी माहिती या श्वेतपत्रिकेत देण्यात आली आहे.
३. या श्वेतपत्रिकेत चीनने म्हटले आहे की, जगभरात आतंकवादामुळे शांती आणि विकास यांस मोठा धोका निर्माण झाला आहे, तसेच त्याने लोकांचे जीवन आणि संपत्ती यांची हानी केली आहे. (असे आहे, तर मसूद अझहर याला ‘जागतिक आतंकवादी’ घोषित करण्यास चीनला काय अडचण आहे, हे त्याने सांगावे ! स्वतःच्या देशातील आतंकवाद निपटून निवळ भारतद्वेषापायी पाकमधील आतंकवाद धगधगत ठेवणार्या चीनला एक दिवस त्याची झळ बसल्यावाचून रहाणार नाही ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
(म्हणे) ‘मुंबईवरील आतंकवादी आक्रमण ‘अती कुख्यात’ !’
मुंबई येथील २६ नोव्हेंबर २००८ च्या आतंकवादी आक्रमणाला चीनने या श्वेतपत्रिकेमध्ये ‘अती कुख्यात आतंकवादी आक्रमणांपैकी एक’ असे म्हटले आहे. (चीनची दुतोंडी भूमिका ! असे आहे, तर त्यास उत्तरदायी असणारा स्वतःचा परमप्रिय मित्र पाकला याविषयी ठणकावून तेथील आतंकवाद नष्ट करण्यासाठी चीन का प्रयत्न करत नाही ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) ही श्वेतपत्रिका प्रसारित करतांनाच पाकचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरैशी चीनच्या दौर्यावर आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात