बांगलादेशातील पीडित हिंदूंसाठी तेथील हिंदु पत्रकार, बुद्धीजीवी आणि हिंदुत्वनिष्ठ काही तरी प्रयत्न करत आहेत; मात्र भाजप सरकार आणि भारतातील हिंदुत्वनिष्ठ संघटना तेथील हिंदूंच्या सुरक्षेसाठी काहीही करत नाही, हे संतापजनक होय !
ढाका : बांगलादेशमध्ये अल्पसंख्यांक हिंदूंवरील अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी ‘भीतीची भीती’ (scare of fear) या विषयावर तरुण पत्रकार कृष्णा दे आकाश यांनी १६ मार्च २०१९ या दिवशी शहरात परिसंवादाचे आयोजन केले होते. या वेळी एक लघुचित्रपटही दाखवण्यात आला. जगभरातील शांतीचा पुरस्कार करणार्या लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी हा चित्रपट उपयुक्त ठरणार आहे. मानवाधिकारासाठी लढा देणारे जगभरातील पत्रकार, मानवी हक्क कार्यकर्ते यांना बांगलादेशातील पीडित अल्पसंख्यांक हिंदूंविषयी सत्य माहिती आणि पुरावे या लघुपटाच्या माध्यमातून मिळणार आहेत.
या परिषदेत प्रमुख वक्ते म्हणून ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’ चे अध्यक्ष अधिवक्ता रविंद्र घोष, बांगलादेश मायनॉरिटी जनता पार्टीचे अध्यक्ष शिमलकुमार रॉय, सोनाटन विद्यार्थी परिषदेचे माजी अध्यक्ष परिमल चंद्रल रॉय आदी उपस्थित होते.