‘लिट्टे’ समवेतचे युद्ध
श्रीलंकेच्या सैन्याने ४० सहस्र निरपराध तमिळी हिंदूंची हत्या केली. याविषयी आधीही श्रीलंकेतील हिंदु जनतेने आवाज उठवला; मात्र भारताने आणि भारताच्या राजकीय पक्षांनी याचा एकदाही विरोध केला नाही कि श्रीलंकेवर दबाव निर्माण करून चौकशीची मागणी केली नाही, हे लक्षात घ्या !
कोलंबो (श्रीलंका) : ‘लिबरेशन टायगर्स ऑफ तमिल इलम्’ (लिट्टे) याच्या समवेत झालेल्या युद्धामध्ये श्रीलंकेच्या सैन्याकडून मानवाधिकाराचे उल्लंघन करण्यात आले होते, असा आरोप करण्यात आला आहे. याची चौकशी करण्यास सिद्ध असल्याचे श्रीलंकेने म्हटले आहे. वर्ष २००९ मध्ये लिट्टेचा प्रमुख प्रभाकरन् याला ठार केल्यावर हे युद्ध थांबले होते. या युद्धाच्या शेवटच्या टप्प्यात श्रीलंकेच्या सैन्याने ४० सहस्र निरपराध तमिळी हिंदु नागरिकांची हत्या केल्याचा आरोप आहे. तत्कालीन श्रीलंका सरकारने मात्र सांगितले होते की, या युद्धात कोणत्याही नागरिकाचा मृत्यू झाला नव्हता.
श्रीलंकेच्या सैन्याचे लेफ्टनंट जनरल महेश सेनानायक यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले की,
- आम्ही या संदर्भात कोणत्याही चौकशीला घाबरत नाही. आम्ही कोणताही गुन्हा केलेला नाही. चौकशीसाठी आंतरराष्ट्रीय चौकशीची आवश्यकता नाही. आमची न्यायपालिका चौकशी करण्यासाठी सक्षम आहे.
- कोणत्याही युद्धात नागरिकांचा मृत्यू होण्याची शक्यता असतेच. हे एक कटू सत्य आहे. याविना युद्ध होत नसते. याचा अर्थ असा नाही की, आम्ही अशा प्रकारचे कोणते कृत्य केेले आहे. आता चौकशीची मागणी म्हणजे गाडलेले भूत बाहेर काढण्यासारखे आहे. त्यापेक्षा गेल्या १० वर्षांत आम्ही केलेल्या चांगल्या कामांकडे पाहिले पाहिजे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात