सरकारने केवळ हिंदूंच्या तोंडावर फेकण्यासाठी गोवंशहत्या बंदीचा कायदा केला आहे. गोवंशहत्या बंदी व्हावी, अशा सरकारची इच्छाशक्ती नाही; अन्यथा गोवंशाची तस्करी बंद होण्यासाठी सरकारने सर्वतोपरी कठोर पावले उचलली असती !
राज्यात गोवंशहत्या बंदी कायदा असतांना त्याची पायमल्ली करणार्या धर्मांधांना कायद्याचे भय नाही. याचे कारण भ्रष्ट पोलीस त्यांना मिळालेले आहेत. देशात सर्वत्र दिसणारी ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
यवतमाळ : दारव्हा येथून भाग्यनगर येथे दीडशे किलो गोमांस घेऊन जाणार्या वाहनाला राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ वर पिंपळखुुटी या गावाजवळ पोलिसांनी १८ मार्चला पहाटे ५ वाजता पकडले. या वेळी धर्मांध आरोपी हिदाईत खा साहिब खा पठाण आणि अहमद खा बशीर खा या दोघांना पोलिसांनी अटक केली.
विशेष म्हणजे हे वाहन पकडण्याआधी या वाहनाने पिंपळखुटी येथील आर्टीओ चेक पोस्ट पार केले होते. त्यामुळे ‘त्या वेळी वाहनाचे वजन आणि कागदपत्रे पडताळत असतांना त्यामध्ये गोमांस असल्याचे दिसून आले नाही का ?’ असा प्रश्न उपस्थित होत आहे. ‘या महामार्गावरून दैनंदिन जनावरांची तथा गोमांसाची तस्करी चालूच असते’, असे स्थानिकांच्या वतीने सांगण्यात येते; मात्र पोलिसांकडून कधीतरीच जनावरांची तस्करी करणार्या वाहनांना पकडण्यात येते. काही भ्रष्ट पोलिसांच्या सहकार्यानेच थेट तेलंगणामध्ये वाहने सोडण्यात येतात. त्यामुळे महामार्गावरून जनावरांच्या तस्करीत वाढ झालेली आहे, असेही स्थानिकांचे म्हणणे आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात