मुंबई : होळी आणि रंगपंचमी या काळामध्ये होणार्या अपप्रकारांना आळा घालण्याविषयीचे निवेदन हिंदु जनजागृती समिती आणि धर्मप्रेमी यांच्या वतीने वांद्रे येथील तहसीलदार कार्यालयात देण्यात आले. तहसीलदारांच्या वतीने कार्यालयातील राजेंद्र बोरकर यांनी हे निवेदन स्वीकारले. महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करावी, आरोग्यास घातक, तसेच प्रतिबंधित रासायनिक रंगांच्या विक्रीला प्रतिबंध करावा, जलाशयांचे प्रदूषण रोखावे आणि बळजोरीने रंग फासून फुगे मारणार्यांवर कठोर कारवाई करावी या मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. या वेळी धर्मप्रेमी सौ. मीना मोरकर, सौ. रश्मी पेडणेकर, श्रीमती वैभवी नाईक, तसेच समितीचे श्री. मंजुनाथ पुजारी उपस्थित होते. याविषयीचे निवेदन वांद्रे पोलीस ठाणे, तसेच नालासोपारा पश्चिम पोलीस ठाण्यातही देण्यात आलेे.