१. उल्हासनगर येथे होत असलेल्या सिंधी लोकांच्या धर्मांतराच्या विरोधात जनजागृती करण्यासाठी बैठकीचे आयोजन आणि त्यातील विविध संघटनांचा सहभाग !
‘उल्हासनगर येथे मोठ्या प्रमाणावर झालेल्या सिंधी लोकांच्या धर्मांतरामुळे जागे झालेल्या हिंदूंनी पद, पक्ष आणि संघटना विसरून धर्मांतराच्या विरोधात संघटितपणे प्रयत्न चालू केले आहेत. या अनुषंगाने विविध ठिकाणी हिंदुत्वनिष्ठांच्या बैठका होत आहेत. हिंदु जनजागृती समितीनेही यात पुढाकार घेतला आहे. समितीच्या वतीने उल्हासनगर, कॅम्प ३ मध्ये घेतलेल्या बैठकीला शहरातील अधिवक्ते, समाजसेवक, पत्रकार, तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदु परिषद, सिंधी कौन्सिल ऑफ इंडिया, जय झुलेलाल सेवा संघर्ष समिती या संघटनांचे कार्यकर्ते त्याचप्रमाणे एन्.जी.ओ.चे कार्यकर्ते, अधिवक्ता मोनीष भाटिया, राहुल चतुर्वेदी, तसेच ब्राह्मण महासभा कल्याणचे लक्ष्मण दुबे, प्रदीप दुर्गिया, श्रीमती कोमल सावंत आदी धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
२. प्रजाकसत्ताक दिनानिमित्त डोंबिवली येथील शाळेत क्रांतीकारकांविषयी माहिती देणार्या फ्लेक्स प्रदर्शनाद्वारे जनजागृती !
२६ जानेवारी या प्रजासत्ताक दिनानिमित्त डोंबिवली येथील ‘किडलॅन्ड’ शाळेत क्रांतीकारकांची माहिती देणार्या फ्लेक्सचे प्रदर्शन लावण्यात आले होते. शाळेचे मुख्याध्यापक श्री. संदीप सूर्यवंशी यांनी ‘प्रदर्शन आवडले’, असे सांगितले.’
– श्री. बळवंत पाठक, ठाणे-रायगड जिल्हा समन्वयक, हिंदु जनजागृती समिती.