जळगाव : छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या ‘हिंदवी स्वराज्या’प्रमाणे धर्माधिष्ठित ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना करणे’ या उदात्त ध्येयाने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हिंंदु राष्ट्र संघटक कार्यशाळां’चे आयोजन करण्यात आले होते. १६ मार्चला साकळी येथे आणि १७ मार्च या दिवशी यावल येथे या एक दिवसीय कार्यशाळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्या.
२७ फेब्रुवारीला हिंदु जनजागृती समितीच्या वतीने यावल येथे ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभे’चे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर स्थानिक धर्मप्रेमींच्या मागणीवरून हिंदु जनजागृती समितीच्या वतीने साकळी आणि यावल येथील युवकांसाठी १० दिवसांचे ‘स्वरक्षण प्रशिक्षण’ शिबीर घेण्यात आले. या शिबिराच्या माध्यमातून ज्या धर्मप्रेमींना पुढे धर्मकार्य करण्याची इच्छा आहे, ज्यांना साधना शिकायची आहे, अशा धर्मप्रेमींना एकत्रित करून या कार्यशाळा घेण्यात आल्या.
साकळी येथील कार्यशाळेत हिंदु जनजागृती समितीच्या सौ. क्षिप्रा जुवेकर आणि युवा संघटक श्री. निरंजन चोडणकर, तसेच हिंदु जनजागृती समितीचे जळगाव समन्वयक श्री. प्रशांत जुवेकर यांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळांमध्ये ‘आपत्काळाच्या दृष्टीने साधनेची आवश्यकता’, ‘हिंदु राष्ट्राची आवश्यकता’, ‘हिंदु राष्ट्राचा संघटक म्हणून काम करतांना आपले आचरण कसे असावे ?’, ‘धर्माचरणाचे महत्त्व’ हे विषय घेण्यात आले. ‘समाजात जाऊन संपर्क कसे करावे ? आणि समाजाला राष्ट्र-धर्माचे कार्य कसे सांगावे ? याविषयी प्रायोगिक भाग घेण्यात आले. कार्यशाळांच्या शेवटी ‘पुढील कार्याची दिशा कशी असावी ?’ याविषयी गटचर्चा घेण्यात आली. या दोन्ही कार्यशाळांना ४५ धर्मप्रेमी उपस्थित होते. दोन्ही ठिकाणी धर्मप्रेमींची पाक्षिक बैठक, तसेच आठवड्यातून तीन दिवस ‘स्वरक्षण प्रशिक्षणवर्ग’ घेण्याचे निश्चित करण्यात आले. उपस्थित सर्वांनी हिंदु राष्ट्राच्या कार्यासाठी वेळ देण्याचे ठरवले आहे.
क्षणचित्रे
- दोन्ही कार्यशाळांमध्ये धर्मप्रेमी अतिशय उत्साहाने सहभागी झाले होते.
- यावल येथील ४ जणांची दुसर्या दिवशी १० वीची परीक्षा होती. तरीही ते चारही जण संपूर्ण कार्यशाळा संपेपर्यंत थांबले होते.
china ke ,,, jesa Act…. hona cahiye,,,,, nehi to (pakistha, bangladesh, indonesiya ke jesa ho jayega)