Menu Close

संयुक्त राष्ट्रांच्या आनंदी देशांच्या सूचीमध्ये भारत १४० व्या, तर पाकिस्तान ६७ व्या स्थानी

  • वास्तविक ज्या देशात सर्वाधिक साधना करणारे नागरिक वास्तव्य करतात, तो देश ‘सर्वाधिक आनंदी’ म्हणून गणला गेला पाहिजे; मात्र पाश्‍चात्त्य आणि कथित प्रगत देश हे भौतिक सुखे, लोकांचे राहणीमान, आरोग्य, स्वातंत्र्य आदी निकष लावून ‘सर्वाधिक आनंदी देशां’ची सूची बनवत असल्यामुळे या सूचीला अध्यात्माच्या दृष्टीने काहीच अर्थ उरत नाही !
  • भारतातील निधर्मी शासनकर्त्यांनी जनतेला साधना शिकवली नसल्यामुळे भारतीय खर्‍या आनंदापासून वंचित आहेत ! स्वातंत्र्यानंतर ७१ वर्षांत या निधर्मी शासनकर्त्यांनी देशाची भौतिक प्रगतीही केली नाही. त्यामुळे संयुक्त राष्ट्रांच्या ‘आनंदी देशां’च्या निकषातही भारत पहिल्या पाचात स्थान पटकावू शकत नाही, हे लज्जास्पद ! 
  • सर्व प्रकारचा हिंसाचार करून आणि जगामध्ये आतंकवाद पसरवूनही पाकिस्तान म्हणे आनंदी ! त्या ‘आनंदा’चे स्वरूप आसुरीच असणार, हे लक्षात घ्या !

न्यूयॉर्क : संयुक्त राष्ट्रांनी प्रसिद्ध केलेल्या आनंदी राष्ट्रांच्या सूचीमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत भारताचा क्रमांक ७ पायर्‍या घसरून तो १४० व्या स्थानी पोहोचला आहे. त्या तुलनेत पाकिस्तान ६७ व्या स्थानी आहे, तर बांगलादेश १२५ व्या आणि चीन ९३ व्या स्थानी आहे. (सर्वाधिक भ्रष्ट, धर्मांध, पाशवी मनोवृत्तीच्या माणसांचा भरणा असलेला पाक आनंदी देशांच्या सूचीत ६७ व्या स्थानी कसा ? यावरून संयुक्त राष्ट्रांनी ‘सर्वांत आनंदी देश’ ठरवण्यासाठी लावण्यात आलेल्या निकषांविषयी लोकांच्या मनात संशय निर्माण होणे स्वाभाविक आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) जगातील सर्वांत श्रीमंत देश असूनही अमेरिका आनंदी राष्ट्रांच्या सूचीमध्ये १९ व्या स्थानी आहे. (केवळ भौतिक सुख आणि सुबत्ता असली म्हणजे आनंदी रहाता येते, असे नाही !अमेरिकेचा उदोउदो करणार्‍यांनी हे लक्षात घ्यावे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) फिनलॅण्ड देशाने याही वर्षी त्याचा प्रथम क्रमांक राखला आहे. ‘जगातील नागरिक स्वत:ला किती आनंदी समजतात’, यावर आधारित जगभरातील १५६ देशांची पाहणी केल्यानंतर हा अहवाल सादर करण्यात आला. या अहवालानुसार गेल्या काही वर्षांमध्ये संपूर्ण जगात आनंदी असण्याच्या प्रमाणात घट झाली आहे. संयुक्त राष्ट्र महासभेने वर्ष २०१२ मध्ये २० मार्च हा ‘जागतिक आनंद दिन’ घोषित केला आहे.

  • संयुक्त राष्ट्रांची या संदर्भातील सूची उत्पन्न, आरोग्यदायी जीवन, सामाजिक स्थिती, स्वातंत्र्य, विश्‍वास आणि उदारता या ६ घटकांवर बनवली जाते.
  • जगातील अनेक देशांमध्ये चिंता, नैराश्य आणि क्रोध यांसह नकारात्मक दृष्टीकोन अशा भावनांमध्येही वृद्धी झाल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. (या दोषांवर मात करण्यासाठी राहणीमान उंचावून लाभ होणार नसून समाजाला साधना शिकवणे आवश्यक आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
  • युद्धग्रस्त दक्षिण सुदान देशाचे नागरिक सर्वाधिक दु:खी आहेत. त्यानंतर दु:खी राष्ट्रांमध्ये मध्य आफ्रिकी गणराज्य (१५५), अफगाणिस्तान (१५४), टांझानिया (१५३) आणि रवांडा (१५२) या देशांचा समावेश आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *