Menu Close

वसई (पालघर) येथे परंपरागत जागेवर होळी साजरी करायला धर्मांधांचा विरोध !

  • हिंदूंनी संघटित होऊन साजरा केला होळीचा उत्सव !

  • पोलीस आणि प्रशासन यांच्याकडून हिंदूंवर दबाव टाकण्याचा प्रयत्न !

हिंदूंच्या उत्सवावर गदा आणण्याची तत्परता दाखवणारे पोलीस आणि  प्रशासन अनधिकृत भोंगे अन् रस्त्यावरील नमाज बंद करण्याची तत्परता का दाखवत नाहीत ?

मुंबई: पालघर जिल्ह्यातील वसई, कोळीवाडा येथे श्री वाल्मिकेश्‍वर मंदिराच्या जवळ जुन्या आदिवासी पाड्याचा पारंपरिक पद्धतीने होळीचा उत्सव वर्षानुवर्षे साजरा केला जातो. या वर्षी मात्र काही धर्मांधांनी ही कब्रस्तानची जागा असल्याचा कांगावा करत होळी साजरी करण्यास विरोध दर्शवला. होळी साजरी करण्यात येऊ नये, यासाठी काही धर्मांधांनी येथील स्थानिकांना धमक्याही दिल्या. (कुठल्याही देशात बहुसंख्यांकांची अशी गळचेपी होत नसेल ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) वसई तहसीलदार कार्यालय आणि वसई पोलीस ठाणे यांनी नोटीस देऊन स्थानिकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. (‘हिंदूंवर अरेरावी आणि धर्मांधांचे तळवे चाटणे म्हणजे कर्तव्य बजावणे’ असे समजणारे पोलीस आणि  प्रशासन ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

हा विरोध वाल्मिकीनगर येथील स्थानिक रहिवासी आणि सर्वपक्षीय हिंदूंनी एकत्र येऊन मोडून काढला आणि धर्मांधांच्या धमक्या आणि प्रशासकीय दबाव यांना बळी न पडता होळीचा उत्सव साजरा केला; मात्र कोणता वाद निर्माण होऊ नये, यासाठी पूर्वापार जागेपासून थोड्या अंतरावर होळी साजरी करण्यात आली. (संघटितपणे होळी साजरी करणार्‍या हिंदूंचे अभिनंदन ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

याविषयी नासीर शेख आणि अब्दुल लतीफ या नावाच्या व्यक्तींनी या ठिकाणी होळी साजरी करण्यात येऊ नये, यासाठी वसई तहसीलदार कार्यालयात होळीचा उत्सव साजरा न करण्याविषयी तक्रार केली होती. त्यानंतर वसई पोलीस ठाण्यातून १८ मार्च या दिवशी आदिवासी संघटनेच्या अध्यक्षा आणि शिवसेनेच्या महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख सौ. कल्पना गंभीरे यांना नोटीस देऊन स्थानिकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. (धर्मांधांच्या तक्रारीची तात्काळ नोंद घेणारे पोलीस आणि प्रशासन हिंदूंच्या तक्रारींची मात्र नोंद घेत नाहीत. पोलीस आणि प्रशासन यांनी हिंदूंची नोंद घ्यावी, यासाठी हिंदूंनी स्वत:चा दबावगट निर्माण करणे आवश्यक आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

परंपरागत उत्सव साजरे करण्यासाठी यांची प्रत्येक वेळी अनुमती घ्यायची का ? – सौ. कल्पना गंभीरे, अध्यक्षा, आदिवासी संघटना

आम्ही वर्षानुवर्षे या ठिकाणी परंपरागत होळी साजरी करत आहोत. या ठिकाणी कब्रस्तानची जागा नाही. या ठिकाणी कब्रस्तान व्हावे, यासाठी ही भूमी बळकावण्याचा प्रयत्न होत आहे. यापुढे शिवजयंती, भंडारा, उत्सव आदी परंपरागत उत्सव साजरे करतांना प्रत्येक वेळी यांची अनुमती घ्यायची का ? आम्ही येथील स्थानिक आहोत. वर्षानुवर्षे येथे रहात आहोत. प्रशासन धर्मांधांच्या दबावाने प्रत्येक वेळी सण साजरे करण्यासाठी हिंदूंवर दबाव का आणत आहे ?

बैठक बोलावून स्वत: प्रशासकीय अधिकार्‍यांची अनुपस्थिती !

या प्रकारानंतर २० मार्च या दिवशी तहसीलदार कार्यालयातून आदिवासी बांधवांसमवेत बैठक बोलावण्यात आली. सकाळी ११.३० वाजता बैठकीची वेळ देण्यात आली; मात्र प्रत्यक्षात अधिकारी या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे पुन्हा दुपारी ३.३० वाजता बैठक बोलावण्यात आली. त्या बैठकीलाही सायंकाळी ५ वाजेपर्यंत स्थानिक रहिवाशांना बसून ठेवण्यात आले. त्यानंतर प्रशासकीय अधिकारी आले. या बैठकीला तहसीलदार आणि जिल्हाधिकारी उपस्थित होते. (जनतेच्या वेळेचे मूल्य नसणारे अधिकारी काय समाजहित साधणार ? असे अधिकारी कशा प्रकारे प्रशासकीय कामकाज करत असतील, याची कल्पना येते. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

धर्मांधांच्या पुढे मिंधे होणारे पोलीस आणि प्रशासन !

या प्रकरणी तक्रार करणार्‍या धर्मांधांना विचारून ‘ते सांगतील त्या ठिकाणी होळी साजरी करा’, असा अजब सल्ला प्रशासकीय अधिकार्‍यांनी दिला. वसई पोलीस ठाण्यातून स्वत: पोलीस अधिकारी येऊन तक्रार करणार्‍या धर्मांधांना घेऊन ते होळीच्या ठिकाणी गेले. प्रत्यक्षात ‘‘ही भूमी स्थानिक रहिवाशांची असून त्याविषयीची सर्व कागदपत्रे आमच्याकडे आहेत’’, असे आदिवासी संघटनेच्या अध्यक्षा सौ. कल्पना गंभीरे यांनी सांगितले. (भूमी कुणाची आहे, याविषयी खात्री करण्याऐवजी धर्मांध सांगतील त्या ठिकाणी होळी साजरी करण्याचा सल्ला देऊन धर्मांधांची मिंधेगिरी करणार्‍या प्रशासकीय अधिकार्‍यांचे अन्वेषणच व्हायला हवे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *