नागपूर येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पोलीस आणि प्रशासन यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
नागपूर : होळी आणि रंगपंचमी यांच्या निमित्ताने होणार्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांच्या वतीने गस्तीपथक सिद्ध करावे, विशेषतः महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या काळात सतर्क राहून असे गैरप्रकार करणार्यांना त्वरित कह्यात घ्यावे, या मागण्या येथे पोलीस आणि प्रशासन यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आल्या. उपजिल्हाधिकारी रविंद्र खजांजी, नागपूर विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त, हुडकेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले, अंबाझरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील चौहाण यांना आणि अन्य शाखांमध्येही निवेदन देण्यात आले. या वेळी धर्माभिमानी, सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.