१. कर्मचार्यांची दुःस्थिती
अ. ‘रुग्णालयात प्रसाधनगृह स्वच्छ करत नाहीत. तसेच लघवी खाली पडलेली असते. तिची दुर्गंधी येत असते.
आ. सकाळी कोणीच झाडायला किंवा पुसायला येत नाही.
इ. रुग्णाची काळजी घेण्याच्या दृष्टीने लक्ष दिले जात नाही; कारण कर्मचारी सतत पालटत असतात. त्यामुळे कोणाकडेच उत्तरदायित्व रहात नाही. त्यामुळे ‘रुग्णाची जबाबदारी हस्तांतरित होते कि नाही’, हे नीट सांगितले जात नाही, असे वाटते. ‘कर्मचारी आहे त्या रुग्णांचे सर्व समजून घेऊन पुढच्यांना सांगतात का ?’, हे तपासले पाहिजे.
२. उपहारगृहाची दुःस्थिती
अ. उपहारगृहामध्ये मोठे सँडवीच घेतले होते. त्यात वर घातलेले चीज चांगले होते; परंतु आत घातलेले चीज आंबट होते.
आ. कॉफी अतिशय पाणीदार असून तिची किंमत २५ रुपये असते.
इ. अन्नाची गुणवत्ता राखली जात नाही.
ई. वडे ३ घंटे आधीच सांगूनही प्रत्यक्षात ते पुष्कळ कडक असतात. सकाळचे देतांनाही ते नीट गरम करून दिले जात नाहीत.
उ. जेवणातील भेंडीची भाजी निब्बर (जून) असून तिची चवही चांगली नव्हती.’
– एक साधक (१९.५.२०१७)
वैद्यकीय क्षेत्रातील अपप्रवृत्तींना वैध मार्गाने रोखण्यासाठी ‘आरोग्य साहाय्य समिती’ची मोहीम !
वैद्यकीय क्षेत्रात घुसलेल्या अनेक अपप्रवृत्तींना वैध मार्गाने रोखण्यासाठी राष्ट्रप्रेमी नागरिकांनी संघटित होणे आवश्यक आहे. वैद्यकीय क्षेत्रातील कटू अनुभव, तसेच आपल्या परिसरात अनुचित घटना घडत असल्यास त्याविषयी आम्हाला त्वरित कळवा.
चांगले आधुनिक वैद्य आणि परिचारिका यांना नम्र विनंती !
पैसे लुबाडणार्या आधुनिक वैद्यांची नावे उघड करण्यासाठी कृपया आम्हाला साहाय्य करा. ही तुमची साधनाच असेल. तुम्हाला तुमचे नाव गोपनीय ठेवण्याची इच्छा असल्यास ते गोपनीय ठेवण्यात येईल.
आपले अनुभव कळवण्यासाठी आणि मोहिमेत सहभागी होण्यासाठी पत्ता
सौ. भाग्यश्री सावंत, आरोग्य साहाय्य समिती, ‘मधु स्मृती’, सत्यनारायण मंदिराच्या शेजारी, फोंडा, गोवा. ४०३ ४०१.
संपर्क क्रमांक : ७०५८८८५६१०
ई-मेल पत्ता : [email protected]
शासकीय रुग्णालयांतील समस्यांच्या विरोधात त्वरित तक्रार करा !
शासकीय रुग्णालयांत अस्वच्छता, रुग्णांची हेळसांड, औषध पुरवठा सुरळीत नसणे, नियमानुसार कामकाज न होणे अशा अनेक प्रकारच्या अयोग्य गोष्टी घडत असतात. याकडे बहुतांश नागरिक दुर्लक्ष करतात किंवा ‘माझ्या तक्रारीमुळे काय होणार’, असा विचार करून तक्रार करण्याचे टाळतात. त्यामुळे या समस्यांना कारणीभूत असणारे कर्मचारी वर्षानुवर्षे कामचुकारपणा करत रहातात. हे रोखण्यासाठी शासकीय रुग्णालयांतील समस्यांच्या विरोधात त्वरित तक्रार करणे आवश्यक आहे. प्रत्येक शासकीय रुग्णालयात स्वागतकक्षाजवळ किंवा रुग्णालय मोठे असल्यास प्रत्येक आंतररुग्ण कक्षात ठेवलेल्या तक्रारपेटीत तक्रार ठेवावी. तसेच तक्रारीत स्वत:चे नाव, पत्ता, दूरभाष क्रमांक आदी तपशीलही द्यावा. जेणेकरून चौकशी अधिकार्याला तक्रारीच्या चौकशीत आपले साहाय्य आवश्यक असल्यास संपर्क करणे शक्य होईल.
अशा प्रकारे तक्रार केल्यास त्याची एक प्रत प्रसिद्धीसाठी सनातन प्रभातलाही (संपादक, सनातन प्रभात, २४/बी, सनातन आश्रम, पोस्ट बॉक्स क्र. ४६, रामनाथी, फोंडा, गोवा) पाठवावी.