Menu Close

हिंदु जनजागृती समितीच्या विरोधानंतर बेंगळूरू येथील ‘मंगळसूत्रासह नग्नता’ हे चित्रप्रदर्शन रहित

हिंदूंनो, या यशासाठी श्रीकृष्णाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करा !

बेंगळूरू : येथे २२ ते ३१ मार्चपर्यंत चित्रकला परिषद आयोजित करण्यात आली आहे. या चित्रकला परिषदेत चित्रकार सुजितकुमार मंड्या यांनी ‘मंगळसूत्रासह नग्नता’ या विषयावर चित्रप्रदर्शित केले होते. (‘हिजाबसह नग्नता’, ‘क्रॉससह नग्नता’ असा आशय घेऊन चित्रप्रदर्शन घेण्याचे धारिष्ट्य असे चित्रकार दाखवतील का ? मंगळसूत्राविषयी हिंदु स्त्रीच्या मनात आदराचे स्थान आहे. तो तिच्यासाठी सौभाग्यलंकार असून त्याविषयी तिच्या मनात अतूट श्रद्धा आहे. असे असतांना अशी चित्रप्रदर्शने काढून तिच्या श्रद्धेला ठेच पोचवण्याचा हा अश्‍लाघ्य प्रयत्न होय ! कलास्वातंत्र्याच्या नावाखाली हिंदूंच्या धार्मिक भावनांना पायदळी तुडवणारे कलाकार हिंदुद्रोहीच होत ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात ) या चित्राच्या प्रदर्शनातून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्यात आल्या आहेत. यामध्ये महिलांना नग्न दाखवण्यात आले आहे. हिंदु जनजागृती समितीची रणरागिणी शाखा आणि ‘भारत एकता’ या संघटनांनी या प्रदर्शनाचा निषेध केला. ‘हिंदूंच्या धार्मिक भावनांचा अनादर करणारे हे अश्‍लील चित्रप्रदर्शन त्वरित रहित करण्यात यावे’, अशी मागणी त्यांनी बेंगळूरू शहर पोलीस आयुक्तांकडे केली. सामाजिक माध्यमांद्वारे या चित्रप्रदर्शनाच्या विरोधात मोहीम राबवण्यात आली. हिंदुत्वनिष्ठांच्या वाढत्या विरोधामुळे चित्रकार सुजितकुमार मंड्या यांनी चित्रप्रदर्शन मागे घेत असल्याचे सांगितले. (असे चित्रप्रदर्शन मागे घेण्यासह अशा कलाकारांना हिंदूंनी क्षमा मागण्यास भाग पाडणे आवश्यक आहे. हिंदूंनो, त्यासाठी वैध मार्गाने प्रयत्न करा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात )

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *