Menu Close

मुंबई येथे विविध ठिकाणी शिवजयंती उत्सव उत्साहात साजरा !

वाशी येथे शिवजयंती उत्सवात सहभागी झालेले श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान आणि शिवसाधना समूह संघटनेचे युवक

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगर येथे २३ मार्च या दिवशी तिथीनुसार विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

नवी मुंबई येथील वाशी डेपो येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सकाळी ११ वाजता श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान आणि शिवसाधना समूह या संघटनांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून शिवरायांची आरती करण्यात आली. या वेळी श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे नवी मुंबई समन्वयक श्री. भरत माळी, सर्वश्री यतेश हेबाळकर, गौरव पवार, रमेश पावजे यांसह मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी युवक उपस्थित होते. घाटकोपर येथे शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने सकाळी ९.३० वाजता भव्य शिवरथ यात्रा काढण्यात आली. या यात्रेमध्ये युवकांसह स्त्री-पुरुष पारंपरिक वेशात सहभागी झाले होते.

कुर्ला येथे १०० हून अधिक मंडळांनी साजरी केली शिवजयंती !

कुर्ला येथे न्यू भारत क्रीडा मंडळाने शिवजयंती साजरी केली. या शिवजयंतीचे वैशिष्ट्य म्हणजे विविध ठिकाणी शिवजयंती साजरी करणार्‍या १०० हून अधिक छोट्या-मोठ्या मंडळांनी एकत्रित येऊन शिवजयंती साजरी केली. या ठिकाणी भव्य मिरवणूक काढण्यात आली.

गोरेगाव येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष यांच्या कार्याचे फ्लेक्स प्रदर्शन

गोरेगाव येथील नागरी निवारा येथील राजा शिवछत्रपती युवा प्रतिष्ठानच्या ठिकाणी हिंदु जनजागृती समितीच्या शिवजयंतीनिमित्त राष्ट्रपुरुष आणि क्रांतीकारक यांच्या कार्याची माहिती देणारे फ्लेक्स प्रदर्शन लावण्यात आले होते. याचा लाभ बहुसंख्य राष्ट्रप्रेमी नागरिकांनी घेतला.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *