Menu Close

आचारसंहितेच्या नावाखाली पोलिसांकडून शिवरायांची वेशभूषा केलेल्या युवकाला हातात तलवार घेण्यास विरोध !

यावल (जळगाव) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक

  • चाळीसगाव (जळगाव) येथे मुसलमानांनी उरुसानिमित्त काढलेल्या तलवार मिरवणुकीवर पोलिसांचा कोणताही आक्षेप नाही !
  • पोलिसांना केवळ हिंदूंच्याच सण-उत्सवांच्यावेळी आचारसंहिता आठवते का ? हिंदूंनो, अशा हिंदुद्वेषी पोलिसांची मानसिकता जाणा !

जळगाव : महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त २३ मार्च या दिवशी शहरात मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशभूषेत एका तरुणाला घोड्यावर स्वार करण्यात आले; मात्र पोलिसांनी आचारसंहितेच्या नावाखाली त्या तरुणाला हातात तलवार घेण्यास विरोध दर्शवला. (‘कोंबडं झाकलं म्हणून सूर्य उगवायचा थांबत नाही’ या उक्तीप्रमाणे पोलिसांनी जरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषा करणार्‍या तरुणाच्या हातातील तलवार वापरण्यास मनाई केली, तरी त्यांनी याच तलवारीच्या बळावर पाच पातशाह्यांचा बीमोड केल्याचा शौर्यशाली इतिहास हिंदूंच्या मनातून कोणीही नष्ट करू शकत नाही ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात ) या घटनेने तरुणांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाल्याची भावना निर्माण झाली आहे. दुसरीकडे चाळीसगाव येथे याच दिवशी मुसलमानांच्या उरुसानिमित्त काढलेल्या संदलीच्या वेळी हातात तलवार घेऊन मिरवणूक काढण्यात आली; मात्र याला पोलीस प्रशासनाकडून कोणताही आक्षेप घेण्यात आला नसल्यासे समजते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *