आता अमेरिकेतील नागरिकांनाही ‘असहिष्णु’ म्हटले जाईल; मात्र असे करतांना जगभरात मुसलमानांच्या विरोधात उद्रेक का वाढत आहे, याचे उत्तर मानवतावादी, निधर्मीवादी आणि सामाजिक धुरिणी यांनी शोधायला हवे !
न्यूयॉर्क : अमेरिकेतील कॅलिफोर्निया प्रांतात एका मशिदीला आग लावण्यात आली. ही घटना घडली त्या वेळी मशिदीत ७ जण होते. यात कोणीही घायाळ झालेले नाही. या मशिदीच्या वाहनतळामध्ये एक पत्र सापडले आहे. त्यामध्ये न्यूझीलंडमध्ये झालेल्या गोळीबाराचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे या आगीच्या मागे ‘श्वेत राष्ट्रवाद्यां’चा हात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या आगीच्या प्राथमिक अन्वेषणामध्ये द्वेषभावनेतून ही आग लावण्यात आली, असे सांगितले जात आहे.
वरिष्ठ पोलीस अधिकारी ख्रिस लिक यांनी सांगितले, ‘‘वाहनतळाच्या ठिकाणी एक पत्र सापडले आहे. त्यामध्ये न्यूझीलंडमध्ये झालेल्या गोळीबाराचा उल्लेख करण्यात आला आहे.’’ मात्र त्या पत्रात नेमके काय लिहिण्यात आले, याचा खुलासा त्यांनी केला नाही. यामागे कुणाचा हात आहे, याची माहिती देण्यासही पोलिसांनी नकार दिला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात