Menu Close

पाकमध्ये आणखी एका हिंदु मुलीचे अपहरण करून धर्मांतर

  • या घटना कायमच्या रोखण्यासाठी आणि धर्मांतर झालेल्या हिंदूंची घरवापसी करण्यासाठी प्रथम भारतात हिंदु राष्ट्राची स्थापना करणे महत्त्वाचे आहे, हे हिंदूंनी लक्षात घ्यावे !
  • भारतात हिंदु राष्ट्राची स्थापना झाली की, इस्रायल ज्याप्रमाणे जगभरातील ज्यूंच्या रक्षणासाठी प्रयत्न करतो, तसे जगभरातील हिंदूंच्या रक्षणासाठी प्राधान्याने प्रयत्न केले जातील !
  • पाकमधील अल्पसंख्यांक हिंदूंविषयी भारतातील एकही पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी, पाकप्रेमी किंवा सर्वधर्मसमभावाचा उदोउदो करणारे तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !

इस्लामाबाद : पाकच्या सिंध प्रांतातील घोटकी गावामध्ये २ अल्पवयीन हिंदु मुलींचे अपहरण करून त्यांचे धर्मांतर आणि मुसलमान तरुणांशी निकाह करून दिल्याच्या घटनेनंतर आता सिंधमध्येच सोनिया भिल नावाच्या आणखी एका हिंदु मुलीचे अपहरण करून तिचे धर्मांतर करण्यात आल्याची माहिती पाकमधील वरिष्ठ पत्रकार बिलाल फारूकी यांनी ट्वीट करून दिली आहे. फारूकी यांनी या ट्वीटद्वारे ‘इम्रान खान सरकार अल्पसंख्यांकांना सुरक्षा देण्यास अपयशी ठरले आहे का ?’, असा प्रश्‍न विचारला आहे.

हिंदु मुलींना त्यांच्या कुटुंबाकडे सोपवा ! – सुषमा स्वराज यांची पाककडे मागणी

भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी घोटकी गावातील २ हिंदु मुलींच्या अपहरणाविषयी पाकला ट्वीट करून सांगितले आहे की, या दोन्ही मुलींना लवकरात लवकर सोडवून त्यांच्या कुटुंबाच्या स्वाधीन करा. या मुलींचे वय हा वादाचा विषय नाही. ‘नवीन पाकिस्तान’चे पंतप्रधान इम्रान खानही विश्‍वास ठेवणार नाहीत की, या वयातील मुली स्वखुशीने धर्मपरिवर्तन करतील, तसेच लग्नाचा निर्णय घेऊ शकतील.

दोन्ही मुलींना सुरक्षा द्या ! – इस्लामाबाद उच्च न्यायालयाचा पाक सरकारला आदेश

इस्लामाबाद उच्च न्यायालयाने या दोन्ही हिंदु मुलींना सुरक्षा पुरवण्याचा आदेश पाकच्या सरकारला दिला आहे. आतापर्यंत या प्रकरणात ७ जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पाक सरकारने या वेळी न्यायालयात दिली. या मुलींचे विवाह करून देणारा मौलवी निकाह खान, ‘पाकिस्तान सुन्नी तहरीक’ पक्षाचा एक नेता आणि या मुलींशी निकाह करणारे २ तरुण यांना अटक करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक फारूख लंझार म्हणाले की, या मुलींचा शोध घेण्यात येत आहे.

धर्मांतरविरोधी विधेयक संमत करा ! – हिंदु खासदार रमेशकुमार वाकवानी यांची मागणी

सत्ताधारी ‘पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ पार्टी’चे हिंदु खासदार रमेशकुमार वाकवानी म्हणाले की, बलपूर्वक धर्मांतराच्या विरोधात बनवण्यात आलेले विधेयक प्राधान्याने विधानसभेत सादर करून ते संमत करण्याची आवश्यकता आहे. धर्माच्या नावावर द्वेषाचे शिक्षण देणार्‍या सर्व लोकांवर आणि बंदी घालण्यात आलेल्या संघटनांवर जशी कारवाई करण्यात येते, तशी कारवाई केली पाहिजे.

पाकमधील इंग्रजी दैनिकांनी अपहरणाच्या घटनेला ठळक प्रसिद्धी दिली आहे; मात्र ऊर्दू वर्तमानपत्रांनी याला प्राधान्य दिलेले नाही.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *