Menu Close

जर्मनीमध्ये आतंकवादी आक्रमणाचा कट रचल्याच्या प्रकरणी १० जिहादी आतंकवाद्यांना अटक

जिहादी आतंकवादामुळे सर्व जगच त्रस्त झाले आहे. याविरोधात आता सर्वांनी संघटित होण्याची आवश्यकता आहे अन्यथा ‘श्‍वेत राष्ट्रवाद्यां’प्रमाणे सर्वत्र उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही !

बॉन (जर्मनी) : आतंकवादी आक्रमणाचा कट रचल्याच्या संशयावरून जर्मन पोलिसांनी १० आतंकवाद्यांना अटक केली आहे. हेस आणि राइनलॅण्ड-पॅलाटिनेट राज्यांमध्ये २०० पोलीस अधिकार्‍यांनी धाडी टाकून या आतंकवाद्यांना अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाहने आणि बंदुका यांचा वापर करून अधिकाधिक मुसलमानेतरांना मारण्याची या आतंकवाद्यांची योजना होती.

फ्रँकफर्टजवळील ऑफेनबाच येथील २१ वर्षीय व्यक्ती आणि वाईजबादेन येथील दोन ३१ वर्षीय बंधूद्वय हे या कटाचे मुख्य संशयित आहेत. सर्व संशयित वय २० ते ४२ वर्षे वयोगटातील आहेत आणि त्यातील बरेच जर्मन नागरिक आहेत, असे पोलिसांच्या प्रवक्त्याने सांगितले.

आतंकवादासाठी वित्तपुरवठा आणि अपराधिक षड्यंत्र रचल्याच्या आरोपाखाली या आतंकवाद्यांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी टाकलेल्या धाडीत २० सहस्र युरो (१६ लक्ष रुपये) रोख, तसेच अनेक चाकू, औषधे, अनेक इलेक्ट्रॉनिक यंत्रे आणि कागदपत्रे जप्त केली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *