कुठे भारताचा भूभाग स्वतःचा आहे असे म्हणत नकाशे जाळणारा चीन, तर कुठे भारताचा भाग असतांनाही पाकव्याप्त काश्मीर आणि अक्साई चीन यांना पाक आणि चीनमध्ये दाखवणार्या नकाशांवर कारवाई न करणारा भारत !
बीजिंग : अनहुई प्रांतातील एका चिनी आस्थापनाने बनवलेले तैवानला स्वतंत्र देश आणि अरुणाचल प्रदेशला भारतामध्ये दाखवणारे जवळपास ३० सहस्र जागतिक नकाशे चीनकडून नष्ट करण्यात आले. चीनच्या सीमा शुल्क अधिकार्यांनी हे नकाशे नष्ट केले. प्रादेशिक अखंडता कायम ठेवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे चीनकडून सांगण्यात आले. ‘हे नकाशे परदेशात पाठवण्यात येणार होते’, असे ‘ग्लोबल टाइम्स’ने त्याच्या वृत्तात म्हटले आहे. अरुणाचल प्रदेश स्वतःचा भूभाग असल्याचा चीनचा दावा आहे. चीन अरुणाचल प्रदेशाला दक्षिण तिबेटचाच भाग मानतो.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात