हिंदू अन्य धर्मियांच्या धार्मिकतेचा मान राखतात; मात्र हिंदूंच्या धार्मिक मिरवणुका मशिदीसमोरून गेल्या की त्यावर हमखास दगडफेक होते किंवा मिरवणुकांचा आवाज बंद करण्याच भाग पाडले जाते ! अशा घटना प्रसारमाध्यमे जाणीवपूर्वक दडपतात आणि हिंदूंच्या आत्मघाती सर्मधर्मसमभावाचा पुरस्कार करण्याचा प्रयत्न करतात !
मल्लपूरम् (केरळ) : येथे रंगपंचमी साजरी करत असतांना २ मुसलमान मुले पांढरा सदरा आणि पायजमा घालून मैदानात आली आणि त्यांनी नमाज पठणासाठी जायचे असल्याचे सांगितले. तेव्हा रंगपंचमी खेळणार्या तरुणांनी त्यांना रस्ता मोकळा करून दिला. ही घटना घडल्याची छायाचित्रे एका छायाचित्रकाराने काढून प्रसारित केली आहेत. महंमद मासुख असे या छायाचित्रकाराचे नाव अहे. या विषयी तो ‘द न्यूज मिनीट’ या संकेतस्थळाच्या प्रतिनिधीशी बोलतांना म्हणाला की, मी ‘सर्फ एक्सेल’चे विज्ञापन पाहिले होते; मात्र तसे छायाचित्र काढण्याचे माझ्या मनात आले नव्हते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात