Menu Close

आतंकवाद्यांनी त्यांच्या तळांमधून बाहेर पडतांना पाक सैनिकांचा गणवेश परिधान करण्याचा पाकचा आदेश

भारताकडून कारवाई होण्याच्या भीतीचा परिणाम

बालाकोट येथील एअर स्ट्राईकनंतर पाक घाबरला आहे. हे लक्षात घेऊन त्याचे अधिकाधिक मानसिक खच्चीकरण करण्यासाठी भारताने पाकमध्ये घुसून अधिकाधिक ‘सर्जिकल स्ट्राईक’ करणे आवश्यक !

नवी देहली : पाकने आतंकवाद्यांना त्यांच्या तळांमधून बाहेर पडतांना पाक सैनिकांचा गणवेश परिधान करण्याचा आदेश दिला आहे. बालाकोट येथे आतंकवादी तळावर भारताने केलेल्या कारवाईनंतर पाकने हा निर्णय घेतला आहे, अशी माहिती भारतीय गुप्तचरांनी दिली. ‘असे केल्याने ते भारतीय गुप्तचरांच्या ‘रडार’वर येणार नाहीत’, असे पाकला वाटते. पाकचे सैन्य आणि आयएस्आय यांनी प्रमुख आतंकवाद्यांसमवेत १६ मार्च या दिवशी घेतलेल्या बैठकीत हा आदेश दिला. या बैठकीत जैश-ए-महंमदला अधिक अर्थपुरवठा करण्यात यावा, जेणेकरून काश्मीर खोर्‍यात अधिकाधिक आक्रमणे करता येतील, असाही निर्णय घेण्यात आला.

भारताच्या गृह मंत्रालयाच्या अधिकार्‍याने याविषयी सांगितले की, पाकला वाटते की, भारताचे उपग्रह सतत पाकमधील आतंकवादी प्रशिक्षण तळांवर लक्ष ठेवून आहेत. येथून कोणीही बाहेर पडला, तरी भारताला त्याची माहिती मिळते आणि लवकरच त्याला ठार केले जाते. जर हा आतंकवादी पाक सैन्याच्या गणवेशात असेल, तर त्याला ओळखणे अवघड होईल.

सुरक्षायंत्रणांच्या एका अधिकार्‍याच्या म्हणण्यानुसार पाकने आतंकवाद्यांचे अनेक तळ दुसरीकडे हालवले आहेत आणि तेथे पाक सैनिकांना पहारा देण्यासाठी तैनात करण्यात आले आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *