स्वस्तिकचा अवमान आणि हिंदूंना ‘गुंड’ म्हटल्याचे प्रकरण
या प्रकरणी केंद्रातील भाजप सरकार केजरीवाल यांच्यावर कारवाई करून ते हिंदुत्वाचे रक्षक आहे, हे दाखवून देईल का ?
फरीदाबाद (हरियाणा) : हिंदूंचे पवित्र धार्मिक चिन्ह स्वस्तिकचा अवमान आणि गुरुग्राम (हरियाणा) येथे होळीच्या दिवशी झालेल्या एका वादाला धार्मिक रंग देऊन हिंदूंना ‘गुंड’ म्हणण्याचा प्रयत्न केल्यावरून अधिवक्ते आणि हिंदु संघटना यांनी येथील सेंट्रल पोलीस ठाण्यात देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात तक्रार केली आहे. तक्रारीची प्रत पोलीस आयुक्त, पोलीस महासंचालक, मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्या कार्यालयांनाही पाठवली आहे. या वेळी अधिवक्त्यांनी केजरीवाल यांच्या विरोधात घोषणाबाजी करून त्यांचा पुतळाही जाळला.
ये विडीओ देखिए। हमारे कौन से ग्रंथ में लिखा है मुसलमानों को मारो? गीता में? रामायण में? हनुमान चालिसा में?
ये लोग हिंदू नहीं हैं, हिंदुओं के वेष में गुंडे हैं। इनकी पार्टी लुच्चे, लफ़ंगे, गुंडों की फ़ौज है। इनसे देश और हिंदू धर्म दोनों को बचाना हर भारतवासी का फ़र्ज़ है https://t.co/NkFMZOBZkF
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) March 23, 2019
Someone sent this … pic.twitter.com/IScYDLgwZr
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) March 20, 2019
अलीकडेच केजरीवाल यांनी एक ट्वीट केले होते. त्यात झाडू स्वस्तिकच्या मागे लागल्याचे चित्र प्रसारित करण्यात आले होते. झाडू हे आपचे चिन्ह आहे. त्यावरून आपवाले स्वस्तिक म्हणजे हिंदुत्वनिष्ठ भाजपच्या मागे लागल्याचे त्यातून ध्वनित होत होते. भाजपला विरोध करण्यासाठी हिंदूंच्या धार्मिक चिन्हाचा वापर केल्यामुळे हिंदुत्वनिष्ठांनी त्यांच्यावर टीका केली होती.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात