न्यूझीलंड येथील मशिदींवरील गोळीबारातील पीडितांशी पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न भेट
- न्यूझीलंडच्या पंतप्रधानांकडे अन्य कोणतेही साहाय्य मागण्यापेक्षा त्यांना धर्म पालटण्यास सांगणार्या मुसलमानाकडून हिंदू काही शिकतील का ?
- अशा गोष्टीमुळेच पाश्चात्त्य जगात ‘श्वेत राष्ट्रवाद’ वाढत आहे, असे म्हटल्यास आश्चर्य वाटू नये !
न्यूझीलंडच्या ख्राइस्टचर्च येथे २ मशिदींमध्ये झालेल्या गोळीबारात ५० जण ठार झाले होते, तर अनेक जण घायाळ झाले होते. या गोळीबारातील पीडित एका निर्वासित केंद्रामध्ये रहात आहेत. येथे नुकतीच न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न यांनी भेट दिली. तेव्हा एका पीडित मुसलमान व्यक्तीशी झालेल्या संवादाचा व्हीडिओ सध्या सर्वत्र प्रसारित झाला आहे. यात ही व्यक्ती म्हणते, ‘मी गेल्या ३ दिवसांपासून प्रार्थना करत आहे की, तुमच्याकडून अन्य नेत्यांनी शिकले पाहिजे. माझी इच्छा आहे की, एक दिवस तुम्ही इस्लाम धर्म स्वीकाराल. माझी इच्छा आहे की, मी तुमच्या समवेत स्वर्गात रहावे.’
या व्यक्तीचे बोलणे ऐकल्यावर अर्डर्न म्हणाल्या की, इस्लाम लोकांना मानवता शिकवतो. (भारतात असे कुठेच कधी कोणाला दिसले नाही, असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो ! काश्मीरमध्ये अल्पसंख्यांक हिंदूंना मशिदींमधून धमक्या देऊन पळवून लावण्यात आले, तेव्हा मानवता दिसली नाही ! अजूनही हिंदू तेथे रहाण्यास जाऊ शकत नाहीत. पाक आणि बांगलादेशामध्ये वर्ष १९४७ मध्ये हिंदूंची लोकसंख्येची टक्केवारी पहाता आता ती हाताच्या बोटावर मोजण्याइतकी झाली आहे, तेव्हा मानवता दिसलेली नाही ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) मला वाटते की, मानवता माझ्याकडे आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात