प्रत्येक साधक हा प्रथमोपचारक हवा ! – सौ. सीमा सामंत
ठाणे : येणारा आपत्काळ पुष्कळ भयानक आहे, असे अनेक संतांनी सांगितलेले आहे. या भीषण आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी प्रथमोपचाराचे शिक्षण प्रत्येक साधकाला अवगत असायला हवे. तसेच प्रत्येक साधक हा प्रथमोपचारक झाला पाहिजे, यासाठी प्रथमोपचार प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. प्रथमोपचार हे प्रत्यक्ष कृती करण्याचे शास्त्र आहे. प्रथमोपचार शिकल्याने आपण आपल्या कुटुंबासह समाजातील लोकांनाही वाचवू शकतो, असे मार्गदर्शन सौ. सीमा सामंत यांनी हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या एक दिवसीय प्रथमोपचार शिबीरात उपस्थितांना केले.
२४ मार्चला डोंबिवली (पश्चिम) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हे शिबिर पार पडले. या वेळी नाडी पडताळणी, अस्थिभंग होणे, भाजणे-पोळणे, एबीसी कॅप इत्यादी प्रथमोपचाराविषयीची प्रात्यक्षिके दाखवून साधकांकडून करवून घेण्यात आली. नाडी पडताळणी याविषयी सौ. प्रज्ञा परब यांनी तात्त्विक भाग सांगून उपस्थित साधकांकडून कृती करवून घेतली. भाजणे-पोळणे हा विषय श्री. चेतन परब यांनी घेतला.
तसेच नौपाडा (ठाणे पश्चिम) येथेही प्रथमोपचार शिबिर घेण्यात आले. या वेळी सौ. मनीषा क्षीरसागर, सौ. भाग्यश्री पळणीटकर, सौ. शालिनी पै यांनी उपस्थितांना विषय सांगून प्रात्यक्षिके करवून घेतली.