Menu Close

महंमद पैगंबरांनी गोमाता वाचवण्याचा संदेश दिला होता : मोहम्मद फैज खान, गोप्रेमी

  • गोमातेच्या रक्षणासाठी एका मुसलमान गोप्रेमीची पायपीट !
  • एक मुसलमान व्यक्ती गोरक्षणासाठी पायपीट करून जनतेचे प्रबोधन करते; पण स्वतःला पुरो(अधो)गामी म्हणवणारे हिंदू मात्र गोमांस पार्ट्या करून गोहत्याबंदीची थट्टा उडवतात. अशा हिंदूंपेक्षा मोहम्मद फैजखान यांच्यासारखे मुसलमान परवडले !

कणकवली : महंमद पैगंबरांनी गोमाता वाचवण्याचा संदेश दिला होता. गायीच्या रक्षणासाठी जात आणि धर्म यांची आवश्यकता नाही. गायीचे रक्षण आपल्या परिवाराच्या कल्याणासाठी आहे, हा संदेश जनमानसात पोचवण्याचा प्रयत्न आहे. देशात धर्म परिवर्तनाचा धंदा चालू असून त्यावर नियंत्रण आणण्यासाठी नव्या पिढीने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे, असे आवाहन रायपूर, छत्तीसगड येथील गोसेवा प्रकोष्ठ मुस्लिम राष्ट्रीय मंचचे राष्ट्रीय संयोजक मोहम्मद फैज खान यांनी केले आहे.

‘गाईचे पालन करा, आपल्या परिवारासाठी आणि रोगमुक्त व्हा’, हा संदेश घेऊन मोहम्मद फैज खान देशभर गोसेवा सद्भावना काढून गोहत्येच्या विरोधात जनजागृती करत आहेत. यात्रेच्या पहिल्या टप्प्यात लेह ते कन्याकुमारी पदयात्रा काढली. आता दुसर्‍या टप्प्यात कन्याकुमारी ते अमृतसर अशी पदयात्रा चालू आहे. गोवा राज्यातून या यात्रेने सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश केला. कणकवली येथे आगमन झाल्यावर खान म्हणाले, ‘‘कर्करोगमुक्त (कॅन्सरमुक्त) होण्यासाठी शेतात गायीच्या शेणाचा खत म्हणून वापर होणे फार आवश्यक आहे. प्रसारमाध्यमांनी गायीचा विषय इतका ताणून धरला आहे की, त्यामुळे समाजामध्ये तेढ निर्माण होत आहे. भारतीय संस्कृती विसरू नका. गाय वाचवण्याची आवश्यकता असून त्यासाठी समाजातील सर्व स्तरांतील लोकांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. गायीविषयी राजकारण करणे चुकीचे आहे. गीता, गायत्री आणि राम हेच सर्व समाजासाठी लाभकारक आहेत. त्यांच्यावरून कोणी राजकारण करत असेल, तर ते अयोग्य आहे. कोकणातील प्रत्येक घरासमोर असलेली ‘तुळस’ हे आरोग्याचे मोठे दैवत आहे. त्याचे रक्षण झाले पाहिजे.’’

मोहम्मद खान हे धर्माने मुसलमान असले, तरीपण त्यांचा उद्देश मात्र एकच ‘केवळ गोमातेवर प्रेम करा आणि तिचे रक्षण करा !’ गत २ वर्षांत १२ सहस्र किलोमीटर मार्गक्रमण केलेली यात्रा शेवटच्या टप्प्यात आली आहे. खान यांनी देशभरातील २५० जिल्हे आणि १६ राज्यांतून हा प्रवास केला आहे. गोव्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यांच्या पदयात्रेचे आगमन झाले. दिवसाला २५ ते ३० किलोमीटर असा प्रवास करत असतांना वेगवेगळ्या घटकांना भेटी देऊन गोरक्षणाचा संदेश ते समाजापर्यंत पोचवत आहेत. खान यांच्यासमवेत गाजीपूर येथील किसन राय आणि उत्तरप्रदेशातील पियुष राय, राजस्थानमधील कश्यप वैष्णव हे सहकारी आहेत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *