समलैंगिकता हि विकृती अाहे. ती समाजाच्या उन्नतीमध्ये अडथळा असून समाजाला अधोगतीकडे नेणारी आहे ! – संपादक , हिंदु जागृती
नवी दिल्ली : समलैंगिक संबंध हा गुन्हा नसून तो लोकांचा खासगी विषय असल्याच्या प्रतिक्रिया राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दिल्या आहेत.
एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह दत्तात्रय होसबोले म्हणाले, ‘समलैंगिक संबंधांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने प्रतिक्रिया का द्याव्यात ? जोपर्यंत इतरांच्या आयुष्यावर परिणाम होत नाही तोपर्यंत समलैंगिक संबंध हा गुन्हा ठरत नाही. तो लोकांचा खाजगी प्रश्न आहे. लैंगिक संबंध या विषयावर संघामध्ये चर्चा करण्यात येत नाही आणि आम्हाला त्याविषयी चर्चा करायचीही इच्छा नाही.‘
भारतीय दंड संहितेतील कलम ३७७ नुसार समलैंगिक संबंध हे अनैसर्गिक असून त्यासाठी जास्तीत जास्त दहा वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे. समलैंगिक संबंध गुन्हा ठरवण्यात येऊ नये, अशी मागणी वेळोवेळी करण्यात येते. दरम्यान अलिकडेच संघाचे सरचिटणीस राम माधव यांनी समलैंगिक संबंध हा गुन्हा ठरावा , हा वादाचा मुद्दा असल्याचे म्हटले होते.
संदर्भ : सकाळ