केरळमध्ये साम्यवादी सरकारकडून अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन केले जाते. त्यामुळे ख्रिस्त्यांच्या दबावाला बळी पडून सरकारने या चित्रपटाच्या निर्मार्त्यांना त्याचे नाव पालटायला अथवा चित्रपटातील काही प्रसंगांना कात्री लावण्यास सांगितल्यास आश्चर्य वाटणार नाही !
कोच्ची : अभिनेते मोहनलाल यांची प्रमुख भूमिका असलेला ‘ल्युसिफर’ हा मल्ल्याळी चित्रपट २८ मार्च या दिवशी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला ‘ख्रिश्चन डेमोक्रेटिक मुव्हमेंट ऑफ केरला’ या ख्रिस्ती संघटनेने विरोध केला आहे. या संघटनेने ‘ख्रिस्ती पंथात ‘ल्युसिफर’ हे सैतानाचे नाव आहे. चित्रपटाला सैतानाचे नाव दिल्यामुळे एक प्रकारे सैतानाचे उदात्तीकरण करण्यात आले आहे. असे करून चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते यांनी ख्रिस्ती मूल्ये आणि चर्च यांची प्रतिमा मलीन केली आहे. ख्रिस्त्यांसाठी ‘ल्युसिफर’ हा सैतान आहे आणि तो कायम राहील’, असे मत फेसबूक या समाजिक प्रसारमाध्यमावर व्यक्त केले आहे. याला अनेक ख्रिस्त्यांनी दुजोरा दिला आहे. या चित्रपटाला राजकीय पार्श्वभूमी आहे. एका राज्याचा मुख्यमंत्री मृत्यूमुखी पडल्यावर सत्ता आणि वर्चस्व यांसाठी जो वाद आणि हिंसाचार होतो, त्याचे चित्रण ‘ल्युसिफर’ या चित्रपटात करण्यात आले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात