हुगली (बंगाल) : येथील आरामबाग क्षेत्रामध्ये तेथील धर्माभिमानी श्री. बिमलेंदू मुखोपाध्याय यांच्या निवासस्थानी नुकतेच समाजातील धार्मिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात रूची असलेल्या लोकांसाठी साधना शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये ३२ धर्माभिमानी सहभागी झाले होते. या शिबिरामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री. सुमंतो देबनाथ, श्री. शंभू गवारे आणि श्री. रामप्रसाद यांनी विषय मांडले. शिबिराच्या प्रारंभी श्री. सुमंतो देबनाथ यांनी नामजप आणि प्रार्थना यांचे महत्त्व, तसेच नामजप कुठला करायचा याविषयी मार्गदर्शन केले. श्री. शंभू गवारे यांनी हिंदु जनजागृती समितीचे कार्य, या कार्याला मिळणारा प्रतिसाद, तसेच राष्ट्र आणि धर्म यांची सद्यःस्थिती यांविषयी माहिती सांगितली. या साधना शिबिराच्या आयोजनामध्ये श्री. बिष्णुपद सरकार यांचे महत्त्वाचे योगदान लाभले.
क्षणचित्रे
- शिबिरात नामजपाचा विषय चालू असतांना त्यातील अनुभूती ऐकून एका महिलेची भावजागृती झाली.
- शिबिरात सहभागी झालेल्या जिज्ञासूंनी साधना विषय जाणून घेतल्यानंतर समितीच्या कार्यकर्त्यांच्या संपर्कात रहाण्याची इच्छा व्यक्त केली. त्यासाठी त्यांनी समितीच्या कार्यकर्त्यांचे संपर्क क्रमांक लिहून घेतले.
- काही जिज्ञासूंनी श्री. सुमंतो देबनाथ यांच्याशी संपर्क साधून साधनेविषयी मार्गदर्शन घेतले.