बंगालच्या उत्तर २४ परगणा जिल्ह्यात सनातन हिंदू संघटनेच्या वतीने धर्मसभेचे आयोजन
उत्तर २४ परगणा (बंगाल) : बंगालच्या उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील दत्तफुकूर येथे सनातन हिंदू संघटनेचे संस्थापक श्री. जोतिर्मय पोद्दार यांनी एक सभा आयोजित केली होती. पुलवामा आक्रमणात हुतात्मा झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली वाहणे आणि पाकिस्तानमधून सुटून आलेले श्री. अभिनंदन यांचे अभिनंदन करणे, या उद्देशाने या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत हिंदु जनजागृती समितीचे पूर्वोत्तर राज्य समन्वयक श्री. शंभू गवारे यांनी प्रमुख पाहुणे म्हणून सभेला संबोधित केले. ‘भारतात हिंदु राष्ट्र स्थापन झाल्यानंतरच हिंदूंच्या स्थितीत पालट घडेल’, असे उद्गार त्यांनी या वेळी काढले. या वेळी व्यासपिठावर श्री. उपानंद ब्रह्मचारी, श्री. अगमानंद महाराज, श्री. अंबिकानंद महाराज उपस्थित होते. सभेला सुमारे १५० हिंदू उपस्थित होते.
क्षणचित्र : सभेतील विषय अधिकाधिक लोकांपर्यंत पोेचावा, या दृष्टीने श्री. जोतिर्मय पोद्दार यांनी आवाज दूरवर पोचण्यासाठी चांगल्या ध्वनीक्षेपण यंत्रणेची व्यवस्था केली होती.