- हिंदु युवतींना धर्मशिक्षण न दिल्यामुळेच त्या ‘लव्ह जिहादी’ कारवायांना भुलतात आणि स्वतःच्या आयुष्याचा अंत करून घेतात !
- ‘कुठे आहे लव्ह जिहाद’ ? आम्हाला तर दिसत नाही’, असे सांगणार्या शासनकर्त्यांना या घटना दिसत नाहीत कि लव्ह जिहाद्यांवर कारवाई करण्यात त्यांना स्वारस्य वाटत नाही ?
रामानुजगंज (छत्तीसगड) : येथील धर्मांध फिरदौस आलम याने एका हिंदु युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि नंतर सामाजिक प्रसारमाध्यमांवर तिची आक्षेपार्ह छायाचित्रे प्रसारित केली. समाजात झालेल्या अपकीर्तीमुळे या मुलीने गळफास लावून आत्महत्या केली.
सदर हिंदु युवती ही पदव्युत्तर शिक्षण घेत होती. (अशा उच्चशिक्षित हिंदु युवतीही धर्मांधांच्या जाळ्यात अडकतात. यावरून हिंदु पालकांनी मुलांना केवळ उच्च शिक्षण देण्याच्या मागे न लागता त्यांना सुसंस्कारित करणे आणि त्यासाठी धर्मशिक्षण देणे किती आवश्यक आहे, हे दिसून येते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) १ एप्रिल या दिवशी फिरदौस आलम याने या हिंदु मुलीची आक्षेपार्ह छायाचित्रे ‘व्हायरल’ केली. त्याविषयीची त्याने सदर मुलीला माहिती दिली. यामुळे तिला धक्का बसला. त्या वेळी या हिंदु युवतीने गयावया करून ‘ही आक्षेपार्ह छायाचित्रे ‘अपलोड’ करू नयेत’, असे सांगितले; मात्र फिरदौस आलम याने तिला धमक्या देत ही छायाचित्रे ‘अपलोड’ केली. ‘मला मारून टाक; परंतु माझी छायाचित्रे ‘अपलोड’ करू नकोस. माझे कुटुंबीय ही अपकीर्ती सहन करू शकणार नाहीत’, असे तिने वारंवार सांगितले. तरीही फिरदौसने ही छायाचित्रे ‘अपलोड’ केली. त्यामुळे हे सहन न झाल्याने हिंदु युवतीने आत्महत्या केली. सदर हिंदु युवती ही एम्एस्सीचे शिक्षण घेत होती, तसेच प्रशासनात नोकरी मिळण्यासाठी विविध स्पर्धा परीक्षाही देत होती.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात