Menu Close

‘आतंकवाद्यांच्या समर्थकांच्या विरोधात कठोर आणि प्रभावी कायदा देशभरात लागू करावा !’

अशी मागणी का करावी लागते ? आतंकवाद्यांच्या समर्थकांवरही कारवाई करायला हवी, हे शासनाला का समजत नाही ?

ओरोस : भारतात राहून शत्रूराष्ट्र पाकिस्तानचा झेंडा फडकावणे, शत्रूराष्ट्राचा जयजयकार करणार्‍या घोषणा देणे, आतंकवादाचे समर्थन करणे, त्यांच्या समर्थनार्थ कार्यक्रम आयोजित करणे, देशविरोधी कृत्ये करणे आदींच्या विरोधात कठोर आणि प्रभावी कायदा करून तो जम्मू-काश्मीरसह संपूर्ण देशभरात लागू करावा अशी मागणी करणारे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १ एप्रिल या दिवशी जिल्हाधिकारी डॉ. अरूण पांढरपोटे यांना देण्यात आले. हे निवेदन पंतप्रधान मोदी यांना संबोधित करण्यात आले आहे. या वेळी धर्माभिमानी निवृत्त सैनिक श्री. सुधाकर सावंत, श्री. संतोष गावडे, श्री. जगन्नाथ केरकर, श्री. पुंडलिक गवस, श्री. सुरेश दाभोलकर, डॉ. अशोक महिंद्रे, कसाल-ओरोस शिवसेना विभाग संघटक डॉ. सूर्यकांत बालम आणि सनातनचे श्री. गजानन मुंज हे उपस्थित होते.

या निवेदनात म्हटले आहे की, जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात जैश-ए-महंमद या आतंकवादी संघटनेने केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआर्पीएफ्च्या) पोलिसांवर १४ फेब्रुवारीला आक्रमण केले. या आक्रमणात ४२ पोलीस हुतात्मा, तर ४० हून अधिक जवान घायाळ झाले. त्यानंतर भारतानेही प्रत्युत्तर म्हणून २६ फेब्रुवारी या दिवशी पाकिस्तानमधील बालाकोट येथे एअर स्ट्राइक केला आणि २५० हून अधिक आतंकवाद्यांना ठार केले. असे असूनही आतंकवाद्यांकडून जम्मू-काश्मीर आणि देशभरात सातत्याने आक्रमणे होत आहेत अन् ही आक्रमणे भारतियांची सहनशीलता संपवणारी आहेत.

पुलवामा येथील प्रकरण घडल्यानंतर राष्ट्रप्रेमी नागरिकांनी अनेक ठिकाणी उत्स्फूर्तपणे सैन्याच्या समर्थनार्थ मोर्चे काढले, सभा घेतल्या, आंदोलने केली. यात अनेक ठिकाणी पाकिस्तानचे झेंडे जाळण्यात आले. अनेक देशप्रेमी नागरिकांनी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी विविध मार्गांनी साहाय्य देऊ केले. संपूर्ण देशात सैनिकांचा बळी घेणार्‍या पाकिस्तानच्या विरोधात संताप असतांना काही धर्मांध आणि त्यांच्या संघटना उघडउघड देशद्रोहाची भूमिका घेत जाणीवपूर्वक पाकिस्तानचा झेंडा फडकावणे, पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा देणे, आतंकवाद्यांच्या समर्थनार्थ कार्यक्रम घेणे, पत्रके वाटणे, असे प्रकार करत आहेत.

या संदर्भात आम्ही काही गोष्टी निदर्शनास आणून देत आहोत

  • पंजाब-फिरोजपूरमध्ये पाकिस्तानच्या सीम कार्डसह एका भारतीय नागरिकाला केंद्रीय सीमा सुरक्षा दलाने अटक केली. हा नागरिक पाकिस्तानच्या ८ व्हॉटस्अ‍ॅप गटात सहभागी होता.
  • बेळगाव (कर्नाटक) येथे ३ मार्च या दिवशी फटाके फोडून पाकिस्तान झिंदाबादची घोषणा देणार्‍या आयुब बशीर मुल्ला (वय १९ वर्षे, कलईगार गल्ली) याला पोलिसांनी अटक केली. या प्रकरणातील अन्य एक संशयित आरोपी महंमदसहेफ आयुब पटेल रुग्णालयात भरती असून उपचारांती त्यालाही अटक करण्यात येणार आहे, तसेच या प्रकरणात अद्याप ३ संशयित धर्मांध पसार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
  • पुणे जिल्ह्यातील लोणावळ्यातील शिवाजी चौकात उपेंद्रकुमार बहादुरसिंह नावाच्या तिकीट तपासनिसाने पुलवामा घटनेच्या विरोधात आयोजित केलेल्या निषेध सभेत पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या.
  • रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख येथे मदरशात हिंदुस्थान मुर्दाबाद आणि पाकिस्तान झिंदाबाद, अशा घोषणा दिल्या गेल्या.
  • देहलीतील वादग्रस्त जेएनयू विद्यापिठात संसदेवर आक्रमण करणार्‍या महंमद अफझलची आजही पुण्यतिथी साजरी केली जाते आणि त्या कालावधीत भारतविरोधी घोषणा दिल्या जातात.
  • वर्ष १९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील प्रमुख सूत्रधार याकूब मेमन या देशद्रोही आतंकवाद्याला ३० जुलै २०१५ या दिवशी फाशी देण्यात आली. देशद्रोही आतंकवादी याकूबच्या समर्थनार्थ १० सहस्रांहून अधिक मुसलमानांनी त्याच्या अंत्ययात्रेत सहभाग घेतला, तसेच अनेक राजकीय नेत्यांनीही त्याला समर्थन दिले. या सर्वांच्या विरोधात कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली आढळून आली नाही.
  • काश्मीरमध्ये प्रत्येक शुक्रवारी नमाजानंतर इसिस या आंतरराष्ट्रीय स्तरावरील आतंकवादी संघटनेचे आणि पाकिस्तानचे झेंडे फडकावले जातात, तर पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाही दिल्या जातात आणि सैनिकांवर दगडफेकही केली जाते.
  • सामाजिक संकेतस्थळांवर उघडपणे आणि मोठ्या प्रमाणात भारतविरोधी वक्तव्ये, पाकिस्तान अन् आतंकवाद यांचे समर्थन करणारी वक्तव्ये अन् चित्रफिती प्रसारित केल्या जातात; मात्र कोणावरच कारवाई होत नाही.
  • काश्मीरपाठोपाठ सध्या उत्तरप्रदेश, राजस्थान यांसह देशात अनेक ठिकाणी उघडउघड इसिसचे झेंडे फडकत आहेत. टोंक (राजस्थान) येथे डिसेंबर २०१६ मध्ये सहस्रो मुसलमानांनी काढलेल्या मोर्च्यात इसिस झिंदाबाद, पाकिस्तान झिंदाबाद, भारत मुर्दाबाद आदी घोषणा देण्यात आल्या. अशा देशद्रोही धर्मांधांच्या नांग्या ठेचण्यासाठी कठोर कायद्याचीच आवश्यकता आहे.

सध्याच्या प्रचलित कायद्यांनुसार यातील फारच थोड्यांवर कारवाई होतांना दिसत आहे आणि कारवाई झाली, तरी थोड्याच कालावधीत ते जामिनावर मुक्त होऊन पुन्हा देशविरोधी घटनांमध्ये सहभागी होत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे जसे पूर्वी आतंकवादी कारवाया करणार्‍यांवर टाडा आणि पोटा यांसारखे प्रभावी कायदे असल्याने जरब होती, त्याप्रमाणेच वरील प्रकारच्या देशद्रोही कारवाया करणार्‍यांसाठीही नवीन कायदे बनवायला हवेत.

तरी या संदर्भात आम्ही आपल्याकडे मागणी करतो की ….

  • व्यक्तीस्वातंत्र्याचा आधार घेऊन पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा देणे, पाकचा झेंडा फडकावणे, पाकच्या समर्थनार्थ कार्यक्रम घेणे, आतंकवादी आणि आतंकवादी कृत्ये यांचे समर्थन करणारे, देशविरोधी कृत्य करणारे आदींवर कठोर कारवाई करणारा कायदा जम्मू-काश्मीरसह संपूर्ण देशभरात लागू करण्यात यावा.
  • आतंकवाद्यांचे समर्थन करणार्‍यांवर तात्काळ कठोर कारवाई होण्यासाठी त्यांना शिक्षेसह त्यांची छायाचित्रे आणि त्यांची माहिती वर्तमानपत्रात प्रसिद्धीस देऊन देशभर जनजागृती करावी !
  • पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा देणारे आणि उपरोक्त कृत्ये करणारे यांचे खटले जलदगती न्यायालयात चालवून त्यांना लवकरात लवकर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करावेत.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *