गंजबासुदा (मध्यप्रदेश) येथे व्यापार्यांच्या बैठकीत हिंदु जनजागृती समितीद्वारे मार्गदर्शन !
गंजबासुदा (विदिशा, मध्यप्रदेश) : आजची पिढी धर्माचरणाविषयी प्रमाण मागत आहे. त्यांना समजेल, अशा वैज्ञानिक भाषेत हिंदु जनजागृती समिती धर्मशिक्षणाचा प्रसार करत आहे. धर्म समजून घ्या, आचरण करून त्याचा लाभ अनुभवा आणि त्याचा प्रसार करा, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश आणि राजस्थान समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी केले. येथील व्यापारी वर्गासाठी आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. येथील व्यापारी श्री. विनोदजी शहा, संघाचे विस्तारक श्री. अंकीत पाठकजी यांनी या बैठकीचे आयोजन केले. धर्मप्रेमी श्री. गजराज राय यांच्या पुढाकाराने ही बैठक झाली. या वेळी सनातन संस्थेचे धर्मप्रसारक श्री. श्रीराम काणे यांनी उपस्थितांना नामजपाचे महत्त्व सांगितले. या वेळी उपस्थितांना स्लाइडद्वारे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाद्वारे होत असलेल्या शोधकार्याची माहिती देण्यात आली. या वेळी माजी आमदार श्री. हरिसिंह रघुवंशी आणि वर्तमान आमदार श्री. संजय जैनजी उपस्थित होते. या वेळी धर्मशिक्षण आणि साधनेचे महत्त्व याविषयी विस्ताराने माहिती देण्यात आली.
विदिशा जिल्ह्यांत वेगवेगळ्या गावांत जागृती बैठकांचे आयोजन !
बरोडा ताल : येथे अध्यापक डॉ. बलराम राजपूत यांनी श्री हनुमान मंदिरात गावातील लोकांसाठी बैठकीचे आयोजन केले.
सिरोंज : येथे ‘विश्व सनातन सेने’च्या पदाधिकार्यांसह बैठक झाली. या वेळी श्री. तरुण जाटव आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
ओखलीखेडा : येथील श्री नरसिंह मंदिरात झालेल्या बैठकीत २० जण उपस्थित होते. सद्गुरुनगर येथील श्री. दर्शन रोहिले यांच्या पुढाकाराने ही बैठक झाली. येथून जवळच असलेल्या गुणा जिल्ह्यातील खिरीयाडांगी येथेही युवकांसाठी बैठक झाली.