हूगली (बंगाल) : येथील चिचुरामधील श्रीकृष्ण सेनेचे संस्थापक श्री. विजय यादव यांच्या पुढाकाराने एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये २१ युवक सहभागी झाले होते. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री. शंभू गवारे आणि श्री. सुमंतो देबनाथ यांनी व्याख्यान घेतले. हिंदूंची सद्यस्थिती, धर्मशिक्षणाची आवश्यकता, हिंदूसंघटनाच्या दृष्टीने हिंदु जनजागृती समितीचे उपक्रम यांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. विषय समजल्यानंतर सर्व युवकांनी धर्मशिक्षणवर्ग नियमित चालू करण्याची मागणी केली.
क्षणचित्र
श्री. विजय यादव यांनी वाराणसी येथे झालेल्या हिंदु जनजागृती समितीच्या प्रांतीय अधिवेशनात भाग घेतला होता. त्यांच्या संघटनेच्या युवकांना राष्ट्र आणि धर्म यांविषयीच्या कार्यात चांगल्या तर्हेने सहभागी होणे शक्य व्हावे, यासाठी त्यांनी त्यांच्या युवकांसाठी समितीच्या वतीने हे व्याख्यान आयोजित केले होते.