अशी मागणी करावी लागते, हे तमिळनाडूतील अण्णाद्रमुक सरकारच्या शासनकर्त्यांसाठी लज्जास्पद ! हिंदूबहुल भारतात हिंदूंना त्यांच्या प्रत्येक न्याय्य मागणीसाठी अशा प्रकारे आवाज उठवावा लागतो, हे संतापजनक ! हिंदूंना मानाने जीवन जगता यावे, यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
चेन्नई : येथे द्रविड कझगम् पक्षाच्या बैठकीत हिंदूंची उपास्य देवता भगवान श्रीकृष्णाला उद्देशून अवमानकारक टिप्पणी करणारे पक्षाचे अध्यक्ष के. वीरमणी यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी चेन्नईच्या पोलीस आयुक्तांना सादर केले.
२२ मार्च २०१९ या दिवशी चेन्नई येथे झालेल्या द्रविड कझगम् पक्षाच्या बैठकीत के. वीरमणी यांनी ‘मुलींची छेडछाड काढणार्या कृष्णाला कारागृहात टाकायला हवे होते’, अशी टिप्पणी केली होती. तसेच राज्यात पोल्लाची येथे झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाची तुलना त्यांनी भगवान श्रीकृष्णाच्या वर्तनाशी केली होती. (हिंदूंच्या आराध्य दैवताविषयी अशी विधाने करून कोट्यवधी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे हे राजकारणी अन्य पंथियांच्या श्रद्धास्थानांविषयी बोलण्याचे धारिष्ट्य दाखवतील का ? हिंदूंनो, अशा हिंदुद्वेषी राजकारण्यांना मतपेटीद्वारे उत्तर द्या ! – संपादक)
तमिळनाडू शिवसेनेचे अध्यक्ष श्री. राधाकृष्णन्, भारत हिंदु मुन्नानीचे अध्यक्ष श्री. आर्.डी. प्रभु, हिंदु मक्कल मुन्नानीचे अध्यक्ष श्री. व्ही. जी. नारायणन्, हिंदु जनजागृती समितीचे तमिळनाडू समन्वयक पी. प्रभाकरन् यांनी संयुक्तपणे हे निवेदन सुपूर्द केले आहे. ‘या प्रकरणी योग्य ती कारवाई करू’, असे पोलीस आयुक्तांनी सांगितले.