कोल्हापूर : ६ एप्रिलला असणारा गुढीपाडवा हिंदु धर्मशास्त्रानुसार साजरा होण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी प्रवचने, प्रात्यक्षिके, तसेच ध्वनीचित्रचकतींद्वारे प्रबोधन करण्यात आले. विषय ऐकल्यावर अनेक ठिकाणी धर्मप्रेमींनी ‘आम्ही शास्त्रानुसारच गुढीपाडवा साजरा करणार’, असे ठासून सांगितले. याच प्रकारे अनेक ठिकाणी हस्तपत्रके, भित्तीपत्रके, प्रत्यक्ष संपर्क यांद्वारेही प्रसार चालू असून प्रवचनांचे आयोजन आणि नियोजन यांच्या प्रत्येक टप्प्यावर धर्मप्रेमींचा सहभागही वाढत आहे.
बारवाड येथे गुढीपाडव्याविषयीची ध्वनीचित्र-चकती दाखवण्यात आली. या वेळी कागल शिवसेनाशहरप्रमुख श्री. किरण कुलकर्णी उपस्थित होते. हुपरी येथे गुढीचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. या वेळी हिंदूंना निमंत्रण देण्याच्या आयोजनात धर्मप्रेमींचा सहभाग होता. हालोंडी येथे धर्मशिक्षणवर्गात येणार्या महिलेने ‘गुढीपाडवा’ विषय घेण्यासाठी पुढाकार घेतला. गुरव वर्गात गुढीचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. वडगाव येथील विठ्ठल मंदिरात गुढीपाडव्याविषयी माहिती सांगण्यात आली. आणूर (कर्नाटक) या ग्रामीण भागात झालेल्या मार्गदर्शनासाठी ५० धर्मप्रेमी उपस्थित होते. याचे आयोजन डॉ. साधना पाटील यांनी केले होते.
विशेष
१. प्रत्येकी १५ दिवसांनी धर्मशिक्षणवर्ग घेण्याची मागणी केली. गुढीपाडव्याच्या निमित्ताने प्रत्येक चौकात भित्तीपत्रके लावणे, प्रदर्शन आणि इतर उपक्रम रावबून हिंदूसंघटन करणे, असे उपक्रम घेण्याचे निश्चित करण्यात आले.
२. श्री. कमलाकर घुंगुरकर यांनी चौकाचौकात भित्तीपत्रके लावली. तरुण युवकांनी साधना करावी, यांसाठी सण, उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात श्री. प्रल्हाद घुंगुरकर पुढाकार घेतात. सौ. आनंदी घुंगुरकर यांनी प्रवचनासाठी उपस्थित हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांची प्रेमाने चौकशी केली.
३. या गावात शिवजयंती तिथीनुसार साजरी केली जाते.
सांगरूळ येथे हर हर महादेव सहकारी दुग्ध संस्थेच्या सभागृहात ‘साधना आणि गुढीपाडवा’ या विषयावर प्रवचन झाले. ‘मास्टरमाईंड कॉम्प्युटर संस्थे’चे श्री. तानाजी वातकर यांनी या प्रवचनाचे आयोजन केले होते, तसेच कमलाकर घुंगुरकर आणि श्री. प्रदीप नाळे यांचाही आयोजनात पुढाकार होता.