- अशा प्रकारच्या धर्मांतरामुळेच भारतातील ईशान्य राज्ये आज ख्रिस्तीबहुल झाली आहेत आणि तेथे हिंदु अल्पसंख्यांक ठरले आहेत !
रांची (झारखंड) : येथील नगरा टोली परिसरात ३१ मार्चच्या रात्री सरना (आदिवासींचा प्राचीन धर्म) धर्मियांचे पैशांचे आमीष दाखवून धर्मांतर करून त्यांना ख्रिस्ती बनवण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडल्याचे समोर आले आहे. ही घटना येथील प्रभाग क्रमांक १९ च्या नगरसेविका रोशनी खलखो यांच्या घराजवळ ही घटना घडली.
रोशनी यांना ही घटना लक्षात येताच या परिसरातील महिलांना समवेत घेऊन घटनास्थळी पोचल्या. तेथे दोन महिला करीना कुजूर आणि सुकरो मुंडा या प्रार्थना करत होत्या, तर किमी मुंडा आणि सुमित्रा यांचे धर्मांतर केले जात होते. रोशनी यांनी करीना कुजूर आणि सुकरो मुंडा यांना पकडून पोलीस ठाण्यात नेले अन् त्यांच्याविरोधात धर्मांतर करण्याची तक्रार नोंदवली. या दोघींकडे ख्रिस्ती धर्माची पुस्तकेही सापडली. या दोघीही पूर्वी सरना धर्मातीलच होत्या; मात्र नंतर त्यांनी धर्मांतर केले आणि आता त्या इतरांचे धर्मांतर करत आहेत. यातील सुकरो मुंडा ही किमी मुंडा हिची मावशी आहे.
धर्मांतरासाठी काँग्रेस आणि जेएम्एम् उत्तरदायी ! – भाजप
भाजपचे खासदार समीर उरांव यांनी या धर्मांतरासाठी काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चा (जेएम्एम्) यांना उत्तरदायी ठरवले. त्यांनी सरकारने यांवर कारवाई करण्याची मागणी केली, तसेच मतांसाठी अनुसूचित जातींना आर्थिक लालूच दाखवली जात आहे, असा आरोपही केला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात