छोटासा देश असणारा फिलिपिन्सही चीनला चेतावणी देऊ शकतो; मात्र भारताने कधी चीनला अशी चेतावणी देण्याचे धाडस केलेले नाही, हे लक्षात घ्या !
मनीला (फिलिपिन्स) : फिलिपिन्सचे राष्ट्रपती रोड्रिगो दुतेर्ते यांनी चीनला चेतावणी देतांना म्हटले आहे, ‘जर चीनच्या सैन्याने दक्षिण चीन सागरामधील पाग-असा बेटाला हात लावला, तर त्याच्यावर सैन्य कारवाई केली जाऊ शकते. माझ्या सैन्याला मी आत्मघाती आक्रमण करण्यास सिद्ध रहाण्यास सांगीन. मी तुम्हाला कोणतीही विनंती करणार नाही.’ चीन, फिलिपिन्स, ब्रुनेई, मलेशिया, तैवान आणि व्हिएतनाम दक्षिण चीन सागरामध्ये खनिज तेलांच्या साठ्यांमुळे येथील विविध बेटांवर त्यांचा दावा करत आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात