Menu Close

(म्हणे) ‘इंद्रदेव लालची आणि बदमाश होते : काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी केला देवतांचा अपमान

  • कुसंस्कारी काँग्रेस नेत्यांची विकृती ! अशी हिंदुद्वेषी विचारसरणी असलेले उमेदवार निवडून आल्यानंतर त्यांनी हिंदुद्वेषी कारभार न केल्यासच नवल !
  • आता हिंदूंनीही लालची आणि बदमाश उमेदवारांना मत द्यायचे का, ते ठरवले पाहिजे !
  • हिंदू सहिष्णू असल्यामुळेच कोणीही उपटसुंभ उठतो आणि हिंदु देवतांवर अश्‍लाघ्य टीका करतो. हिंदूंनी अशा उमेदवारांना मत मागायला आल्यानंतर त्यांना याविषयी वैध मार्गाने जाब विचारावा; जेणेकरून देवतांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करण्याचे पुन्हा कोणाही धाडस करणार नाही !
  • अन्य पंथीय नेते कधी त्यांच्या श्रद्धास्थानांची अशी टिंगलटवाळी करतात का ? हिंदू नेते मात्र स्वःच्या श्रद्धास्थानांची टिंगलटवाळी करण्यालाच पुरुषार्थ समजतात. यावरून हिंदूच हिंदु धर्माचे खरे वैरी आहेत, हे स्पष्ट होते !

नागपूर : इंद्रदेवाचा करिष्मा तुम्हाला माहीत आहे. इंद्रदेव हे लालची आणि बदमाश देव होते. जेव्हा जेव्हा वार पडायचा, तेव्हा ते वर जायचे. आपल्या येथे वर ‘नरेंद्र’ आणि खाली ‘देवेंद्र’ आहे. दोघांच्याही नावात ‘इंद्र’ आहे. आता जनता मोठी देव आहे. त्यामुळे या इंद्राला वाचवायचे कि मारायचे, हे ठरवायचे काम तुमचे आहे, अशा प्रकारे देवतांचा अपमान करणारी मुक्ताफळे येथील लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी ३१ मार्च या दिवशी कार्यकर्त्यांच्या बैठकीत उधळली. हिंदु देवतांचा अवमान केल्याविषयी त्यांच्या विरोधात ४ एप्रिल या दिवशी प्रतापनगर पोलीस ठाण्यात अधिवक्ता परिक्षित मोहिते यांनी तक्रार प्रविष्ट केली आहे. काही दिवसांपूर्वी जयदीप कवाडे यांनी भाजपच्या नेत्या तथा केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्यावर नाना पटोले यांनी त्यांची पाठ थोपटली होती.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *