Menu Close

पाकमधील अल्पसंख्य हिंदू भोगत असलेल्या नरकयातना आणि भारतातील हिंदूंचे कर्तव्य !

हिंदूंनो, पाकमधील आपल्या भगिनींच्या रक्षणार्थ कृतीशील व्हा !

स्वातंत्र्याच्या वेळी पाकमधील हिंदूंची लोकसंख्या २५ टक्के होती. हे प्रमाण आता ३ टक्क्यांहून अल्प झाले आहे. तेथील हिंदू आज शब्दशः नरकयातना भोगत आहेत. दिवसाढवळ्या हिंदूंच्या मुलींचे अपहरण केले जात आहे, त्यांचे धर्मांतर करून त्यांची वेश्याव्यवसायासाठी विक्री केली जात आहे. हिंदूंचे हत्याकांड तर नित्याचीच बाब बनली आहे. एकूणच पाकमध्ये अल्पसंख्य हिंदूंचा पद्धतशीरपणे वंशविच्छेद चालू आहे. एवढे होऊनही तेथील हिंदूंवरील या अन्यायाकडे हिंदुबहूल भारतातील आतापर्यंतच्या सर्व सरकारांनी जाणीवपूर्वक कानाडोळा केला आहे. त्यामुळे आता भारतातील समस्त हिंदूंनी आपल्या धर्मबांधवांच्या साहाय्याला धावून जाण्याची वेळ आली आहे. तेथील हिंदूंना न्याय, आश्रय आणि प्रतिष्ठा मिळवून देऊन त्यांचे भारतात पुनर्वसन करण्यासाठी प्रयत्न करणे, हे भारतातील प्रत्येक हिंदूचे आद्यकर्तव्य आहे. याविषयीचा ऊहापोह प्रस्तुत लेखात केला आहे.

१. पाकिस्तानमधील अल्पसंख्य हिंदूंच्या वाट्याला आलेली नरकयातना, हे फाळणीचेच महापाप !

‘पाकमधील अल्पसंख्य हिंदू आज जीवंतपणीच नरकयातना भोगत आहेत. त्यांना अतिशय हीन दर्जाची वागणूक दिली जात आहे. भारतातील हिंदूंनी शांततेसाठी फाळणी स्वीकारली; परंतु ती शांतता काही त्यांना मिळाली नाही. फाळणीस अनेकांचा विरोध होता; परंतु तत्कालीन काँग्रेसच्या नेत्यांनी फाळणी करून हिंदूंना हिंदूंपासून वेगळे केले. त्याचे परिणाम भारतातील आणि पाकमधील हिंदू आजही भोगत आहेत.

२. हिंदूंच्या हत्या करणे आणि त्यांच्या बायकांचा उपभोग घेणे म्हणजे शरीयत कायद्याचे पालन !

वर्ष १९४७ पासून पाकिस्तानमध्ये शरीयत कायदा लागू झाल्यानंतर हिंदूंच्या धर्मांतराचे प्रमाण वाढत गेले. शरीयत कायद्यात, ‘काफिरांच्या बायका या उपभोग घेण्यासाठी गुलाम म्हणून वापराव्यात’, ‘जेव्हा मनात येईल, तेव्हा त्यांची मालमत्ता लुटावी’, ‘त्यास त्यांनी विरोध केला, तर त्यांची हत्या करावी’, असे सांगितले आहे. तेथील धर्मांध लोक अल्पसंख्य हिंदूंशी वागतांना या शरीयत कायद्याचे ‘पालन’ करतात ! या धर्मांधांना तेथील पोलीस आणि न्यायालये हेही साथ देतात. अशात तेथील हिंदूंना कधी तरी न्याय मिळेल का ?

३. अल्पवयीन हिंदु मुलींचे अपहरण, तसेच धर्मांतर करून त्यांचा निकाह म्हातार्‍या मुसलमान पुरुषाशी लावून देणे, ही नित्याचीच घटना !

पाकमध्येे हिंदु मुलींचे त्यांच्या घरातून सर्रास अपहरण केले जाते. त्यांच्यावर ३ – ४ मास बलात्कार केला जातो आणि नंतर त्यांचे धर्मांतर केले जाते. त्यानंतर त्यांचा निकाह एखाद्या म्हातार्‍या मुसलमान पुरुषाशी लावून दिला जातो अथवा वेश्याव्यवसायासाठी त्यांची विक्री करण्यात येते. त्यानंतर त्या मुली परत कधीही दिसत नाहीत. या घटना तेथे नित्याच्याच झाल्या आहेत. परिणामी घरातील मुली बेपत्ता झाल्यावर त्या घरामध्ये निर्माण झालेली दहशत, त्यांची भेदरलेली दृष्टी आणि शारीरिक अन् मानसिक पातळीवर झालेली खच्चीकरण, या सर्व गोष्टींची आपण कल्पनाही करू शकत नाही.

४. सिंध प्रांतात प्रत्येक दिवशी होते ३ अल्पवयीन हिंदु मुलींचे अपहरण !

गेल्या २० वर्षांपासून सिंध प्रांतातील हिंदू अत्यंत भयभीत जीवन जगत आहेत; कारण तेथे प्रत्येक दिवशी किमान ३ अल्पवयीन हिंदु मुलींचे अपहरण केले जाते. विशेष म्हणजे पाकिस्तानमध्ये त्यास मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिले जाते. हा हिंदूंचा जिवंतपणी होणारा वंशविच्छेद आहे !

पाकमध्ये अपहरण होण्याच्या भीषण प्रकाराची उदाहरणे येथे वानगीदाखल दिली आहेत. यावरून प्रत्यक्षात तेथे काय परिस्थिती असेल, याचा अंदाज येऊ शकतो.

अ. पाकमधील देहरकी गावातील हरजी यांच्या २ मुलींचे धर्मार्ंध मुसलमानांनी अपहरण केले. त्यानंतर घोटगी येथील दर्ग्यामध्ये त्यांचे धर्मांतर करण्यात आले. दर्ग्यातील धर्मगुरूंच्या म्हणण्यानुसार ‘या मुली इस्लामच्या शिकवणीमुळे प्रभावित झाल्याने त्यांनी स्वतःहून धर्मांतर केले.’ सदर मुली अल्पवयीन असल्याने कायद्यानुसार त्यांचा विवाह होऊ शकत नाही. त्यामुळे मुलींच्या कुटुंबियांनी ‘निकाह करण्यासाठी आमच्या मुलींचे बलपूर्वक अपहरण करून धर्मांतर करण्यात आले’, अशी तक्रार स्थानिक पोलीस ठाण्यात प्रविष्ट केली. ‘सिंध चाईल्डस मॅरेज रिस्ट्रेंट अ‍ॅक्ट’, या कायद्यानुसार ‘१८ वर्षांखालील कोणताही मुलगा किंवा मुलगी ‘बाल’, या श्रेणीत येते आणि त्यांचा विवाह होऊ शकत नाही.’ तथापि पोलिसांनीही दर्ग्याच्या धर्मगुरूंच्या सुरात सूर मिसळवत ‘सदर मुलींनी स्वतःहून इस्लाम स्वीकारला आहे’, असे सांगणारी चित्रफित मुलींच्या कुटुंबियांना दाखवली. मुलींनी दबावापोटी तसे केले नसेल कशावरून ?

आ. पाकमधील बादीन या जिल्ह्यातील कानिओ मेघवार यांच्या १५ वर्षांच्या मुलीचे धर्मांध मुसलमानांनी भर बाजारातून अपहरण केले. सदर मुलीला मानसिक आजार असल्याने तिची मानसिक स्थिती चांगली नव्हती. उपचारांसाठी ती तिच्या आईसह कराचीतील तिच्या बहिणीकडे रहाण्यास गेली होती. त्यांची घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असून तिची आई लोकांच्या घरी घरकाम करून उदरनिर्वाह चालवते. त्या अपहरण झालेल्या मुलीचा अजूनही ठावठिकाणा लागलेला नाही.

५. शरीयत कायद्यानुसार मुसलमानांविरुद्ध काफिरांना साहाय्य करणे, हा ‘कुर्फ’ (गुन्हा) समजला जात असल्याने पोलीस आणि न्यायालये यांच्याकडून हिंदूंना साहाय्य नाही !

पाकमधील इतके भीषण अत्याचार होऊनही त्यांना कोणीही वाली नसतो. पीडित हिंदू न्याय मागण्यासाठी पोलिसांकडे गेल्यास पोलीस त्यांना काडीचेही साहाय्य करत नाहीत; कारण शरीयत कायद्यानुसार मुसलमानांविरुद्ध काफिरांना (मुसलमानेतर लोकांना) साहाय्य करणे, हा ‘कुर्फ’ (गुन्हा) समजला जातो ! त्यामुळे पोलीस आणि न्यायालये पीडित हिंदूंना साहाय्य करत नाहीत. पाकिस्तानमधील हिंदू हा अन्याय सर्व मोठ्या प्रमाणात भोगत आहेत. हे अमानवी अत्याचार सहन करण्याची त्यांची शक्ती संपली आहे. या नरकातून सोडवणूक होण्यासाठी ते भारताकडे आशेने पहात आहेत.

६. पाकमधील पीडित हिंदूंचे भारतात पुनर्वसन व्हावे, यासाठी भारतातील हिंदूंनी आवाज उठवणे आवश्यक !

पाकमध्ये हिंदूंच्या होणार्‍या वंशविच्छेदामुळे ते भयभीत झाले आहेत. ते न्यायासाठी भारताकडे अगदी आशेने पहात आहेत. जवळपास सर्वच हिंदू भारतात येऊ पहात आहेत; मात्र भारत सरकार पीडित हिदूंकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करत आहे. हे आणखी किती दिवस चालू रहाणार ? त्यामुळे आता भारतातील हिंदूंनी आपल्या धर्मबांधवांच्या साहाय्याला धावून गेले पाहिजे. त्यांना न्याय, आश्रय आणि प्रतिष्ठा मिळवून देऊन त्यांचे भारतात पुनर्वसन करण्यासाठी प्रयत्न करणे, हे भारतातील प्रत्येक हिंदूचे आद्यकर्तव्य आहे. यासाठी भारतातील हिंदूंनी आवाज उठवला पाहिजे. सरकारला हे करण्यासाठी भाग पाडले पाहिजे. प्रसंगी त्यासाठी वैध मार्गाने आंदोलने केली पाहिजे. आपण धर्माने एकमेकांशी बांधलेलो आहोत. पाकमधील हिंदूंचे भारत हे खर्‍या अर्थाने घर आहे. आपण सीमारेषेवर जाऊन आपल्या हिंदु बांधवांना भारतात परत आणले पाहिजे.

७. पाकमधील हिंदूंना वाचवण्याची हीच वेळ !

सध्या सर्व जग इस्लामी आतंकवादाविरूद्ध आहे. या अनुकूल परिस्थितीचा लाभ उठवून आपण पाकमधील आपल्या पीडित हिंदु बंधूंना परत आणण्यासाठी पावले उचलली पाहिजे. आपण जर आता जागृत झालो नाही, तर पाकिस्तानमध्ये असलेले जेमतेम ३ टक्के हिंदू एकतर मारले जातील किंवा त्यांचे धर्मांतर करण्यात येईल आणि आपल्याला ते कायमचे पारखे होतील. तथापि आपल्या सर्व हिंदूंची इच्छाशक्ती जागृत झाली, तर हे ३ टक्के हिंदू वाचतील आणि ते भारतात आल्यावर येथील १०० कोटी हिंदूंची शक्ती वाढेल. हे केले, तर आताच होईल अन्यथा पुढे कधीच होणार नाही.’

(संदर्भ : विस्थापित पाकिस्तानी हिंदूंसाठी कार्यरत ‘निमित्तेकम’, या संघटनेकडून प्राप्त माहिती)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *