परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त गुढीपाडव्याच्या पवित्र दिनी पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, लातूर, तासगाव, बेळगाव अशा विविध ठिकाणच्या मंदिरांत देवांना साकडे घालण्यात आले. या वेळी अनेक धर्मप्रेमी आणि साधक उपस्थित होते. अनेकांनी या अभियानात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. याविषयीचा सविस्तर वृतांत छायाचित्रांसहित येथे देत आहोत.
पुणे जिल्ह्यातील विविध मंदिरांमध्ये साकडे
पुणे : भोर तालुक्यातील खंडोबाची वाडी येथील मारुति मंदिरात, पिंपळे गुरव येथील मारुति मंदिरात, तसेच मंचर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यातील सर्व अडथळे दूर व्हावेत, तसेच परात्पर गुरु डॉ. आठवले यांना दीर्घारोग्य मिळावे यांसाठी सामूहिक प्रार्थना करण्यात आली. प्रत्येक ठिकाणी साधारण ३० जण उपस्थित होते.
मंचर येथील मंदिरात ह.भ.प. रोहिदास महाराज भोर, अमरनाथ सेवा संघाचे उपाध्यक्ष श्री. संजय कडधेकर, आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सौ. सुनीता चिखले, ज्ञानेश्वरी चिखले, सौ. वसुंधरा बेंडे, सौ. भाग्यश्री घुले, सौ. रश्मी भुते, सौ. उज्ज्वला पोखरकर, सनातन प्रभातच्या वाचक आणि हितचिंतक सौ. वृषाली बाणखेले, श्री संप्रदायाचे श्री. दत्तात्रय आचारी आदी मान्यवर, तसेच सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्’ अशा घोषणाही देण्यात आल्या.
‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर प्रवचन
याच अभियानाच्या अंतर्गत चाकण येथे एस्.पी. आघाव पाटील शिक्षण संस्था संचलित संतोष ऑल-राउंडर अकादमीमध्ये ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर श्री. रघुनाथ ढोबळे यांनी प्रवचन घेतले. विद्यार्थी अन् पालक यांच्यासह ३५ जण येथे उपस्थित होते.
सोलापूर येथील श्री सिद्धश्वराला साकडे !
सोलापूर : येथेही गुढीपाडव्याच्या शुभदिनी श्री सिद्धेश्वर मंदिर येथे धर्मप्रेमींनी साकडे घातले. या वेळी उपस्थितांनी हिंदु राष्ट्र स्थापनेतील अडथळे दूर व्हावेत, तसेच परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आयुरारोग्य लाभावे, यासाठी श्री सिद्धेश्वराला प्रार्थना केली. या वेळी सर्वश्री राजेश मंगळवेढेकर, प्रशांत सरवदे, साई क्षीरसागर, सतीश महाले, आप्पा शहापुरे, संतोष भागनगरे, अंबादास कडूगुडा, प्रवीण नराल, संशोधन न्यारम, नवीन दोरनाल, अनिल मदगुंडी या धर्मप्रेमींसह अनेकजण उपस्थित होते.
सोलापूर येथील आसरा चौक येथे श्री दत्त मंदिरात धर्मप्रेमींनी साकडे घातले. लिंबीचिंचोळी (जिल्हा सोलापूर) येथील हनुमान मंदिरात साकडे घालण्यात आले, तर येळेगाव (जिल्हा सोलापूर) येथील हनुमान मंदिरात धर्मप्रेमींनी साकडे घातले. तिन्ही ठिकाणी अनुक्रमे १८, २० आणि ४० जण उपस्थित होते.
लातूर येथील श्री जगदंबा देवीला साकडे !
लातूर : येथील गंज गोलाई येथील श्री जगदंबा माता मंदिरात देवीला साकडे घालण्यात आले. या वेळी अधिवक्ता गिरीधर बोटवे, सर्वश्री विष्णू तिगिले, लहू सांडूर, रत्नदीप निगुडगे, गणेश पाटील, संजय उजनीकर, शुभम पवार, सनातन संस्थेचे श्री. हिरालाल तिवारी आदी उपस्थित होते.
कुमठे (तासगाव) येथील ग्रामदैवतास साकडे !
कुमठे (तालुका तासगाव, जिल्हा सांगली), : हिंदु राष्ट्र-जागृती अभियानाच्या अंतर्गत सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने परात्पर गुरु डॉ. आठवले यांना स्वास्थ लाभावे यासाठी, तसेच हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील अडथळे दूर होण्यासाठी गुढीपाडव्याच्या शुभदिनी ग्रामदैवत श्री नृसिंह मंदिर येथे साकडे घालण्यात आले. या वेळी ग्रामपंचायत सदस्य श्री. भगवान गुरव यांसह सनातन प्रभातचे वाचक, धर्मप्रेमी असे ३० जण उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात