Menu Close

परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आयुरारोग्य लाभावे, तसेच हिंदु राष्ट्राची स्थापना यासाठी विविध ठिकाणी देवाला साकडे !

मुंबई : हिंदु राष्ट्र-जागृती अभियानाच्या अंतर्गत सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त धर्मप्रेमींनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आयुरारोग्य लाभावे, तसेच ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यातील अडथळे दूर व्हावेत’ यांसाठी मुंबईत विविध ठिकाणी देवाला साकडे घालण्यात आले. या वेळी उपस्थितांनी उत्स्फूर्तपणे ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्’ अशी घोषणा दिली.

भांडुप – येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने रेल्वे फाटकाजवळील भांडुपच्या ग्रामदेवीच्या गावदेवी मंदिर येथील प्रार्थनेला धर्मप्रेमी श्री. सुरेश काकडे उपस्थित होते. या वेळी हितचिंतक सौ. सुरेखा कदम यांनी देवीची ओटी भरली. या प्रसंगी प्रार्थनेला ७ धर्मप्रेमी उपस्थित होते. गावदेवी टेकडी येथील मंदिरात घालण्यात आलेल्या साकड्याच्या वेळी सनातन प्रभातच्या वाचक सौ. प्राची बापर्डेकर, सौ. जयश्री वालकर, सौ. कुमुदिनी झगडे यांनी गावदेवीमातेची ओटी भरली. या वेळी पूज्यपाद आसारामबापू संप्रदायाचे ब्रिजेश सिंह, बजरंग दलाचे सर्वश्री लालबहाद्दूर सिंह, विनोद जैन, शिवसेनेचे सर्वश्री मोहन कांबळी, सुरेश सुतार, प्रथमसाफल्य सेवा संघाचे अध्यक्ष श्री. शेखर गावडे, पुरोहित श्री. विजय ठोंबरे, तसेच सनातन प्रभातचे ८ वाचक यांच्यासह ३१ धर्मप्रेमी उपस्थित होते. या वेळी गावदेवी टेकडी येथील मंदिराचे उपाध्यक्ष श्री. चंद्रकांत नाईक यांनी चांगले सहकार्य केले.

कोपरखैरणे येथील चिकणेश्‍वर मंदिरात साकडे घालतांना जगद्गुरु रामानंदाचार्य श्री नरेंद्र महाराज यांचे भक्तगण स्वत:हून प्रार्थना करण्यासाठी सहभागी झाले. या वेळी योग वेदांत सेवा समितीचे श्री. प्रकाश लोरे यांसह १२ धर्मप्रेमी उपस्थित होते. नेरूळ येथील झुलेलाल मंदिरात या मंदिराचे अध्यक्ष श्री. राजकुमार साधवानी आणि त्यांच्या समाजाचे ५५ भाविक प्रार्थनेत सहभागी झाले होते.

बोईसर नवापूर रोड येथील श्रीराम मंदिर येथे गुजराती मासिकाचे वाचक हिना मंगलदास शहा या सर्व कुटुंबासह उपस्थित होत्या. या मंदिरातील पुजार्‍यांसह १२ धर्मप्रेमी उपस्थित होते.

अंधेरी- जोगेश्‍वरी येथील जोगेश्‍वरीमाता (गुंफा) मंदिर येथे वाचक, जिज्ञासूंसह १० धर्मप्रेमींनी प्रार्थना केली. या वेळी धर्मप्रेमी सर्वश्री प्रसाद जागुष्टे, अनिल काळे हेही उपस्थित होते.

वडाळा- शीव येथील मुरलीधर मंदिर येथे १२ धर्मप्रेमी सहभागी झाले होते. यातील दोन महिला भाविकांनी धर्मशिक्षणवर्गात येण्याची सिद्धता दर्शवली. प्रार्थना श्री. नारायण धुपकरगुरुजी यांनी घेतली. दर्शनार्थी भाविकांना विषय सांगितल्यावर अनेकजण उत्स्फूर्तपणे प्रार्थनेत सहभागी झाले.

नालासोपारा, संयुक्तनगर येथील श्री साई दत्त मंदिरात साकडे घालण्यात आले. या वेळी योग वेदांत समिती, राष्ट्र प्रथम, शिवसेना या संघटनांचे आणि पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते. सर्वश्री जितेंद्र हजारे, निलेश खोकानी, राहुल सोनी, मनोज जोशी, अजित आरोस्कर, हरी सावंत, नारायण सावंत आदी धर्मप्रेमी उपस्थित होते. श्री. देविदास विरकरगुरुजी यांनी साकडे घातले आणि यापुढे नियमितपणे साकडे घालण्याची इच्छा व्यक्त केली.

घाटकोपरची ग्रामदेवता श्रीपद्मावती माता मंदिरामध्ये साकडे घालण्यासाठी २२ जण उपस्थित होते.

मस्जिद येथील मुंबादेवी मंदिरात मुंबापुरी देवीच्या चरणी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर साकडे घालण्यात आले. या वेळी धर्मप्रेमी श्री. दीपक दुबे आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. बळवंत पाठक यांनी देवीच्या चरणी प्रार्थना केली. या वेळी मंदिराचे प्रशासकीय अधिकारी हेमंत जाधव यांचे सहकार्य लाभले.

सांगली आणि कोल्हापूर येथेही देवाला साकडे !

सांगली/कोल्हापूर : सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात गुढीपाडव्याच्या निमित्ताने ठिकठिकाणी सामूहिक गुढी, प्रवचन, ग्रंथ प्रदर्शन यांचे आयोजन करण्यात आले होते, तसेच सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने ठिकठिकाणी साकडे घालण्यात आले.

१. विटा (जिल्हा सांगली) येथे सामूहिक गुढीचे आयोजन करण्यात आले होते, तसेच श्रीराम मंदिर येथे साकडे घालण्यात आले. या वेळी २५ धर्मप्रेमी उपस्थित होते.

२. पाचगाव (जिल्हा कोल्हापूर) येथील भैरवनाथ मंदिरात साकडे घालण्यात आले. तेथे ३५ धर्मप्रेमी उपस्थित होते.

३. हेर्ले (जिल्हा कोल्हापूर) येथे श्री हनुमंताच्या चरणी साकडे घालण्यात आले.

४. मरळी (कोल्हापूर) येथे गुढीपाडव्याच्या निमित्ताने प्रवचन घेण्यात आले. याचा लाभ १५० धर्मप्रेमींनी घेतला. येथे लावण्यात आलेल्या सनातनची सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ कक्ष यांना चांगला प्रतिसाद मिळाला.

५. तळंदगे (जिल्हा कोल्हापूर) येथे धर्मप्रेमी महिलांनी हनुमान मंदिरात साकडे घातले.

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *