राजस्थानमध्ये सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने हिंदु राष्ट्र संपर्क अभियान
जयपूर : कुंभमेळ्यामध्ये सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या धर्मशिक्षण प्रदर्शनाला भेट देणारे जिज्ञासू आणि धर्मप्रेमी यांना संपर्क करण्यासाठी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांनी अलीकडेच संयुक्तपणे हिंदु राष्ट्र संपर्क अभियान राबवले. या अभियानाच्या अंतर्गत जयपूर, सवाई माधोपूर, दौसा आणि करोली या जिल्ह्यांमध्ये सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस आणि हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश आणि राजस्थान राज्याचे समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी राज्यभर धर्मप्रेमींच्या भेटीगाठी घेतल्या, तसेच काही ठिकाणी धर्मप्रेमींना संबोधित केले.
जयपूर येथे ठिकठिकाणी हिंदुत्वनिष्ठांच्या भेटीगाठी, तसेच ग्रामबैठका आणि प्रवचन यांचे आयोजन
- जयपूर येथील सियाराम बाबा मंदिराचे महंत श्री हरिशंकर वेदांती यांनी ‘जयपूर येथील स्थानिक मंदिरांमध्ये सनातनचे धर्मशिक्षण देणारे प्रदर्शन लावण्यासाठी सहकार्य करू’, असे सांगितले.
- जयपूर येथील गायत्री परिवाराचे श्री. रामराय शर्मा यांनी ‘हिंदुत्वाच्या दृष्टीकोनातून सनातन संस्था आणि गायत्री परिवार एकत्रित कार्य कसे करू शकते’, याविषयी चर्चा केली. त्यांनी गायत्री परिवाराच्या विविध मोठ्या कार्यक्रमांमध्ये सनातन संस्थेचे धर्मशिक्षण विषयक प्रदर्शन लावण्याची इच्छा व्यक्त केली.
- अचरोल (जयपूर) येथे ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर ग्राम बैठकीचे आयोजन केले. यात गावातील २५ लोकांनी सहभाग घेतला.
- जयपूर येथील निंबार्क मंदिरामध्ये ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर जिज्ञासूंसाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. १० भक्तांनी यात सहभाग घेतला.
सवाई माधोपूर जिल्ह्यात विविध ठिकाणी संपर्क
- मकसुदनपुरा (सवाई माधोपूर) येथील निंबार्क संप्रदायाचे श्री राधे राधे सरकार महाराजांनी त्यांच्या हिंदुत्वनिष्ठ भक्तांचे संपर्क क्रमांक दिले, तसेच त्यांचे भक्त असलेल्या काही गावांमध्ये हिंदु राष्ट्र विषयक कार्यक्रम आयोजित करण्याचे निश्चित केले.
- गंगापूर सिटी येथील रा.स्व. संघाचे विभाग संचालक श्री. भानू पारीख यांनी धर्मशिक्षण विषयक प्रवचन आयोजित करण्याचे निश्चित केले.
- गंगापूर सिटी येथील अमित कुमार आणि निरंजन कुमार या युवकांनी स्वतः शिकवत असलेल्या कोचिंग क्लासेसमध्ये आणि स्वतःच्या परिवारामध्ये धर्मशिक्षण विषयक कार्यक्रम आयोजित करण्याचे निश्चित केले.
करोली आणि दौसा जिल्ह्यातील हिंदुत्वनिष्ठांकडून युवकांचा प्रतिसाद
- केलादेवी (करोली) येथील दुकानदार ओमप्रकाश गुप्ता यांनी स्वतःच्या गावामध्ये तसेच ‘केलादेवी व्यापारी संघा’मध्ये धर्मजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्याची इच्छा प्रकट केली.
- करोली येथे ‘हिंदु राष्ट्राची आवश्यकता आणि दिशा’ या विषयावर युवकांसाठी प्रवचन आयोजित करण्यात आले. २० युवकांनी या प्रवचनाचा लाभ घेतला. या ठिकाणी मासिक धर्मशिक्षणवर्ग चालू करण्याचे निश्चित झाले.
- दौसा (जिल्हा दौसा) येथील धर्मप्रेमी श्री. ललित शर्मा आणि श्री. नरेंद्र जोशी यांनी ‘पुढील वेळी शहरात धर्मशिक्षण आणि ‘हिंदु राष्ट्राची स्थापना’ या विषयी कार्यक्रमाचे आयोजन करू’, असे सांगितले.