परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त ‘हिंदु राष्ट्र-जागृती अभियान !’
जयपूर : सनातन संस्थेचे संस्थापक आणि हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्थान परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने राजस्थान, मध्यप्रदेश आणि हरियाणा येथे ठिकठिकाणी सामूहिक प्रार्थना करण्यात आल्या. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आयुरारोग्य लाभावे आणि हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यातील अडथळे दूर व्हावेत, यासाठी प्रार्थना करण्यात आली.
राजस्थानमध्ये मंदिरे आणि बैठका येथे सामूहिक प्रार्थना !
करौली : येथील सुप्रसिद्ध श्री मदनमोहन मंदिरात धर्मप्रेमी श्री. अक्षय पराशर, केतन शर्मा यांच्यासह अन्य धर्मप्रेमी प्रार्थना करण्यासाठी उपस्थित होते. विशेष म्हणजे या निमित्ताने प्रत्येक शनिवारी मंदिरामध्ये सामूहिक हनुमान चालिसा म्हणण्याचा निर्धार युवकांनी केला.
झुंझुनू : येथील उद्योजक श्री. उमेश खेतानजी यांनी चाओ दादी मंदिरात सामूहिक प्रार्थना केली. त्यासह येथील चाओ दादी विद्या मंदिरात विद्यार्थ्यांकडूनही ही प्रार्थना करवून घेण्यात आली.
बगडी (सोजत, पाली) : येथे सनातनच्या संत पू. (सौ.) सुशीला मोदी यांनी युवकांच्या बैठकीत सामूहिक प्रार्थना करवून घेतली.
मध्यप्रदेशमध्ये हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या बैठकांमध्ये सामूहिक प्रार्थना !
मंडला (मध्यप्रदेश) : येथे हिंदु सेवा परिषदेचे श्री. दुर्गेश ठाकूर यांनी नववर्षानिमित्त आयोजित बैठकीत उपस्थित धर्मप्रेमींकडून सामूहिक प्रार्थना करवून घेतली.
इंदौर (मध्यप्रदेश) : येथे अखिल भारतीय हिंदु महासभेच्या वतीने आयोजित नववर्षाच्या कार्यक्रमात सनातनच्या साधिका सौ. पुष्पा सावंत यांनी सर्वांना सामूहिक प्रार्थना सांगितली. या वेळी २५० जण उपस्थित होते. यासाठी अखिल भारतीय हिंदु महासभेचे प्रदेश महामंत्री श्री. जितेंद्रसिंह ठाकूर यांचे सहकार्य लाभले. या वेळी व्यासपिठावर हिंदु महासभेचे श्री. मनीषसिंह चौहान आणि आर्य समाजाचे डॉ. अखिलेशचंद्र शर्मा उपस्थित होते.
भोपाळ (मध्यप्रदेश) : येथील गीतबंगला स्थित शिवमंदिरात सौ. वासंती कुलकर्णी आणि सौ. सुशीला मालवीय यांनी उपस्थितांकडून प्रार्थना करवून घेतली, तर खेडापति हनुमान मंदिरात सौ. पंकज भदौरिया यांनी सामूहिक प्रार्थना करवून घेतली.
हरियाणातील चरखी दादरी येथे रामराज्याच्या स्थापनेसाठी सामूहिक प्रार्थना
हरियाणा : नववर्षदिनी हरियाणाच्या चरखी दादरी जिल्ह्यातील अटेला कला गावातील शिवमंदिरामध्ये रामराज्य निर्मितीसाठी आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे आयुरारोग्य उत्तम रहाण्यासाठी सामूहिक प्रार्थना करण्यात आली.