प्राचीन मूर्तींची हानी केल्याचे प्रकरण
- मूर्तींना हानी होईपर्यंत पुरातत्व विभाग आणि राज्यातील काँग्रेस सरकार झोपले होते का ? अन्य धर्मियांच्या धर्मस्थळी चित्रीकरण करण्यास अशा प्रकारची अनुमती देण्याआधी पुरातत्व विभाग किंवा राज्य सरकार यांनी १०० वेळा विचार केला असता; मात्र हिंदू सहिष्णु असल्याने त्यांना वारंवार गृहित धरले जाते !
- हिंदूंच्या देवतांच्या मूर्ती चैतन्यदायी असतात. त्यांना हानी पोचल्यास त्याची भरपाई पैशांनी करून देता येत नाही, तर कठोर उपासना करून त्यात पुन्हा चैतन्य आणावे लागते. हे धर्मशास्त्रच राजकारणी आणि भारतीय व्यवस्था यांनी न शिकवल्यामुळे त्यांच्याकडून हिंदूंच्या अशा अमूल्य ठेव्यांची वारंवार हेळसांड केली जाते !
नवी देहली : अभिनेते सलमान खान यांच्या ‘दबंग ३’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी नर्मदा नदीजवळच्या किल्ल्यातील प्राचीन मूर्तींची हानी केल्याच्या प्रकरणी पुरातत्व खात्याने त्यांना नोटीस बजावली आहे. मध्यप्रदेशच्या मांडू येथे ऐतिहासिक जल महालात उभारलेले २ सेट तात्काळ हटवण्याचा आदेश पुरातत्व विभागाने दिला आहे. निर्मात्यांनी या आदेशाचे पालन न केल्यास चित्रीकरण रहित केले जाईल, असेही या नोटिसीमध्ये म्हटले आहे.
या प्रकरणी मध्यप्रदेशच्या सांस्कृतिक मंत्री विजयलक्ष्मी साधो म्हणाल्या की, पर्यटन विकास व्हावा, यासाठी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी आम्ही अनुमती दिली होती; मात्र चित्रीकरणाच्या वेळी तेथील प्राचीन मूर्तींना हानी पोचली असेल, तर संबंधित व्यक्तींवर कारवाई करण्यात येईल.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात