गोवंशियांच्या हत्यांच्या प्रकरणी शहरात पोलिसांनी आतापर्यंत असंख्य धाडी घातल्या; मात्र या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघालेला नाही. त्यामुळे धाडी घालणे हा निवळ दिखाऊपणा आहे का, अशीच शंका नागरिकांना येते ! गोवंश हत्याबंदी कायदा पायदळी तुडवणार्या धर्मांधांवर जुजबी कारवाई करणार्या पोलिसांवरही कारवाई करण्याची वेळ आली आहे, असे वाटल्यास चूक ते काय ?
धुळे : शहर पोलिसांनी शहरातील १०० फुटी रस्त्यावरील एका गोदामावर धाड टाकून गुरांचे मांस, तीन बैल आणि चारचाकी वाहन कह्यात घेतले. तसेच एका अल्पवयीन मुलासह साकीर कुरेशी गुलामनबी मुर्तजा कुरेशी या धर्मांधाला अटक करण्यात आली. (अल्पवयीन मुलांना अवैध कामे करण्यास प्रवृत्त करायचे, धर्मांधांचा हा कावेबाजपणा ओळखायला हवा ! गोवंश हत्याबंदीच्या कायद्याची काटेकोर कार्यवाही न केल्यानेच गोवंशाची तस्करी आणि अवैध पशूवधगृहे बोकाळली आहेत ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात