पाकमध्ये २ अल्पवयीन मुलींचे अपहरण करून बलपूर्वक धर्मांतर केल्याचे प्रकरण
पाक सरकार, प्रशासन आणि आता न्यायालय यांवरही विश्वास ठेवता येणार नाही, हेच यातून स्पष्ट होते ! जगभरातील हिंदूंच्या रक्षणासाठी भारतात हिंदु राष्ट्राच्या स्थापनेला पर्याय नाही !
इस्लामाबाद : सिंध प्रांतातील २ हिंदु मुलींचे बलपूर्वक धर्मांतर आणि विवाह झालेला नाही, असे मत इस्लामाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केले. पाकच्या सिंध प्रांतातील घोटकी जिल्ह्यात २ अल्पवयीन हिंदु मुलींचे अपहरण करून त्यांचे धर्मांतर करण्यात आले होते. त्यानंतर या मुलींचा मुसलमान पुरुषांशी बलपूर्वक विवाह लावण्याच्या प्रकरणी इस्लामाबाद उच्च न्यायालयाने या मुलींना पतींसमवेत रहाण्याची अनुमती दिली. या बहिणी असणार्या मुलींनी त्यांना पतींसमवेत रहाण्याचीच इच्छा व्यक्त करणारी याचिका प्रविष्ट केली होती. त्यावर उच्च न्यायालयाने हा निकाल दिला. दोन्ही बहिणींचा बलपूर्वक धर्मांतर आणि विवाह झाला नसल्याचे न्यायालयाने मान्य केले.
पाकच्या ‘डॉन’ वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, या प्रकरणातील चौकशी आयोगाने अहवाल सादर केला. या दोघींचा वैद्यकीय अहवाल आला असून त्यात दोघीही सज्ञान असल्याचे नमूद करण्यात आले आहे. भारताने दोन्ही बहिणी सज्ञान नसल्याचा हवाला देत विवाहास विरोध दर्शवला होता. त्यानंतर पाकच्या सरकारने प्रकरणाची चौकशी करण्याचा आदेश दिला होता.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात