जनता दल (सं) पक्षाकडून राममंदिराच्या सूत्राचा विरोध
भाजपने स्पष्ट बहुमत असतांनाही गेल्या ५ वर्षांत राममंदिर बांधले नाही. आताच्या निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले नाही; मात्र भाजप आघाडीला मिळाले आणि राममंदिराच्या विषयावर भाजपने काही करण्याचा प्रयत्न केला, तर त्याला जनता दल (सं)कडून विरोध होणार, हे स्पष्ट आहे ! त्यामुळे ‘भाजप पुढेही राममंदिर बांधणार नाही’, असेच आता हिंदूंनी समजावे का ?
नवी देहली : १२ एप्रिल या दिवशी बिहारच्या हाजीपूर येथे राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधील जेडीयू म्हणजे जनता दल (संयुक्त) आणि भाजप या पक्षांच्या एकत्रित बैठकीत कार्यकर्त्यांमध्ये राममंदिराच्या प्रश्नावरून जोरदार हाणामारी झाली. या वेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी जेडीयूच्या नेत्यांना व्यासपिठावरून खाली खेचण्याचा प्रयत्न केला. ‘हाजीपूरमध्ये निवडणुकीच्या प्रचारासाठी राममंदिराचा विषय घेऊ नये’, असे जेडीयूचे राष्ट्रीय सचिव संजय वर्मा यांच्याकडून या बैठकीमध्ये सांगण्यात आल्याने भाजपचे कार्यकर्ते भडकले आणि नंतर हाणामारी झाली. (५ वर्षांत राममंदिर बांधले असते, तर असा प्रसंगच घडला नसता ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात