Menu Close

दानीश खान नावाच्या व्यक्तीकडून ८ युवतींशी विवाह केल्याचे नवव्या पत्नीकडून उघड

हिंदूंना एकच पत्नी करण्याच्या कायद्यात बांधून मुसलमानांना त्यांच्या धर्मानुसार अनेक पत्नी करण्याच्या दिलेल्या अधिकाराचा हा दुरुपयोग सरकार कधी थांबवणार ?

भोपाळ : युवतींना प्रेमाच्या जाळ्यात फसवणे, त्यांच्याशी विवाह करणे आणि नंतर त्यांना सोडून देणे असे करणार्‍या दानीश खान या युवकाचा भोपाळ पोलीस शोध घेत आहेत. दानीश खान याने यापूर्वी वेगवेगळ्या ८ युवतींशी विवाह केला होता. यातील २ युवती अन्य धर्मांतील होत्या. (हा ‘लव्ह जिहाद’ भाजप सरकारला कधी दिसणार ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) त्याच्या नवव्या पत्नीने हे सत्य उघड केले, असे भोपाळ पोलिसांनी सांगितले.

१. दानीश खान १७ वर्षांचा असल्यापासून मुलींना भुलवून त्यांच्याशी विवाह करत होता. आता त्याचे वय ३५ वर्षे असून त्याने नवव्या मुलीशी निकाह केला होता.

२. ही नववी पत्नी घरात झाडलोट करत असतांना तिला छायाचित्रांचे ५-६ अल्बम मिळाले. ते बघितल्यावर तिच्या पतीचे यापूर्वी ८ विवाह झाल्याचे तिला समजले. तिने ती छायाचित्रे पती दानीश याला दाखवली, तेव्हा त्याने ते अल्बम जाळून टाकले.

३. पत्नीने घरात याविषयी प्रश्‍न उपस्थित केल्यानंतर तिला मारहाण करण्यात आली. तिने या प्रकरणी पोलिसांत तक्रार केली. भोपाळ पोलिसांनी या प्रकरणी चौकशी चालू केली आहे. त्याच्या ७ पत्नींना बोलावून चौकशी केल्यावर दोन पत्नींनी तक्रार नोंदवण्यास नकार दिला.

४. दानीश खान अल्पवयीन मुलींशी विवाह करता होता. यासाठी तो १० रुपयांच्या स्टॅम्प पेपरद्वारे तो ‘निकाह’ झाल्याचे दाखवत होता आणि त्यांच्याशी तलाक घेतांनाही १० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर नोटरी करत होता.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *