-
भाग्यनगर (तेलंगण) येथे रामनवमीनिमित्त मिरवणूक आणि जाहीर सभा यांचे आयोजन
-
मिरवणुकीत लाखाहून अधिक हिंदू सहभागी
भाग्यनगर : मी स्पष्ट करू इच्छितो की, आम्ही केवळ अयोध्येत राममंदिराच्या बांधकामाविषयी चर्चा करत नाही, तर काशी आणि मथुरा मुक्त करणे, हेही आमचे ध्येय आहे, असे प्रतिपादन येथील गोशामहल मतदारसंघातील भाजपचे आमदार आणि प्रखर हिंदुत्वनिष्ठ, तसेच श्रीराम युवा सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. टी. राजासिंह यांनी येथे केले. रामनवमीनिमित्त १४ एप्रिल या दिवशी येथे भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणुकीच्या शेवटी येथील हनुमान व्यायामशाळेच्या मैदानात भव्य धर्मसभा आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे तेलंगण आणि आंध्रप्रदेश समन्वयक श्री. चेतन गाडी यांनीही मार्गदर्शन केले. या सभेचे सूत्रसंचालन समितीचे मुंबई येथील प्रवक्ते श्री. सतीश कोचरेकर यांनी केले. अखंड हिंदु राष्ट्राची स्थापना करण्याची प्रतिज्ञा करून सभेचा शेवट करण्यात आला. सभेपूर्वीच्या मिरवणुकीत लाखाहून अधिक हिंदू सहभागी झाले होते.
हिंदु जनजागृती समितीच्या कार्याशी जोडल्यामुळे स्वतःला भाग्यवान समजतो ! – टी. राजासिंह
श्री. टी. राजासिंह म्हणाले की, मी अनेक वर्षांपासून हिंदु जनजागृती समितीच्या कार्यात सहभागी होत आहे. समिती काही वर्षांपासून देशात हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे. समितीकडून हिंदु राष्ट्र-जागृती सभा आणि हिंदु अधिवेशन यांचे आयोजन करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. मी स्वतःला भाग्यवान समजतो की, त्यांच्या सभांना आणि अधिवेशनांना मला उपस्थित रहाण्यास मिळते. यातून ‘मीही हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कार्य करत आहे’, याचा मला आनंद मिळतो. जेव्हा परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी या संस्थेची स्थापना केली आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा संकल्प केला, तेव्हा ते एकटेच होते. आता सहस्रो साधक त्यांच्या मार्गदर्शनासुनार कार्य करत आहेत. मलाही गुरुदेवांचा आशीर्वाद मिळाला आहे.
टी. राजासिंह यांनी त्यांच्या मार्गदर्शनात मांडलेली सूत्रे
१. इतिहास निर्माण करूनच मरायचे !
जे देश आणि धर्म यांसाठी समर्पित होतात, ते छत्रपती शिवाजी महाराज म्हणवले जातात. हसता हसता फाशीवर चढणारे भगतसिंह, राजगुरु आणि सुखदेव म्हणून अमर झाले आहेत. आपल्याला अशा पद्धतीने मरायचे आहे. किड्यामुंग्यांप्रमाणे मरायचे नाही. आपल्याला हिंदु धर्मामध्ये जन्म मिळाला आहे, तर इतिहास निर्माण करूनच मरायचे आहे.
२. नेताजी बोस आणि लालबहादूर शास्त्री यांना कोणी मारले, याची चर्चा होत नाही !
‘बाहुबली’ चित्रपटातील ‘कट्टप्पा’ नावाच्या पात्राने ‘बाहुबली’ पात्राला का मारले?, असा विषय अनेक दिवस देशात चर्चिला गेला. दुर्दैवाची गोष्ट अशी की, भारत पारतंत्र्यात असतांना जे देशाच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष करत होते, त्यात नेताजी सुभाषचंद्र बोस हे प्रमुख होते; मात्र त्यांना कोणी मारले ?, हा विषय देशात कधीच चर्चेला येत नाही. कोणताही युवक किंवा बुद्धीवादी यावर चर्चा करत नाही. भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी वर्ष १९६५ च्या युद्धात लाहोरपर्यंत भारताचा झेंडा फडकावला. अशा पंतप्रधानांना रशियामध्ये विष देऊन मारण्यात आले. याची चर्चा देशात होत नाही; कारण आजचा युवक ‘बाहुबली’ चित्रपटाचा भाग १ आणि २ पहाण्यातच व्यस्त आहे. जोपर्यंत हिंदु युवक इतिहास जाणून घेऊन जागृत होणार नाहीत, तोपर्यंत ते देश आणि धर्म यांसाठी समर्पित होऊन कार्य करू शकणार नाहीत.
३. तेलंगणच्या मुख्यमंत्र्यांनी ते हिंदू असल्याचे दाखवून द्यावे !
आमचे दुर्दैव आहे की, तेलंगण राज्याला असा मुख्यमंत्री मिळाला आहे की, जो टिळा लावून वर इस्लामी टोपी घालतो आणि धर्मनिरपेक्ष होतो. त्यांना निवडणुकीच्या वेळी हिंदूंची आठवण होते. माझे त्यांना आव्हान आहे की, ते जर खरेच हिंदु असतील, तर मी त्यांच्या पक्षात सहभागी होईन आणि त्यांनी माझ्यासमवेत अयोध्येत जाऊन राममंदिर बांधण्यासाठी सहकार्य करावे, गोमातेच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरावे, लव्ह जिहाद करणार्यांना धडा शिकवावा, धर्मांतर रोखण्यासाठी प्रयत्न करावेत. आज तेलंगणमध्ये हिंदू सुरक्षित नाहीत; कारण जे हिंदूंना समाप्त करण्याची भाषा करतात, त्यांच्यासमवेत मुख्यमंत्री आहेत.
राममंदिरासाठी प्रथम हिंदु राष्ट्राची स्थापना आवश्यक ! – चेतन गाडी
हिंदु जनजागृती समितीचे तेलंगण आणि आंध्रप्रदेश समन्वयक श्री. चेतन गाडी म्हणाले की,
- केवळ अयोध्येमध्ये राममंदिर बनवायचे नाही, तर देशात ४० सहस्र मंदिरे पाडून मशिदी आणि चर्च बांधण्यात आले आहेत. ते परत घेऊन तेथे मंदिर बनवण्यासाठी देशात हिंदु राष्ट्राची स्थापना करायची आहे.
- देशात सहस्रो हिंदु तरुणी लव्ह जिहादमध्ये अडकत आहेत. देशात प्रत्येक १४ मिनिटांनी एका महिलेवर बलात्कार होत आहे. धर्मनिरपेक्ष देशात महिला कधीही सुरक्षित राहू शकत नाहीत. यासाठी हिंदु राष्ट्राचीच आवश्यकता आहे.
- हिंदु राष्ट्र रामराज्यासारखेच असणार आहे. त्यामुळे कोणताही राजकीय पक्ष ते स्थापन करू शकत नाही. ते केवळ रामभक्त, धर्मनिष्ठ, देशभक्त हिंदू यांच्या महासंघटनाने आणि अथक प्रयत्नानेच साकार होणार आहे. यासाठी आपल्याला आपल्या मुखात आणि हृदयात श्रीरामाला वसवले पाहिजे.
- भगवंताच्या वचनानुसार दुष्टांचा संहार करण्यासाठी श्रीरामाचा पुन्हा अवतार होईल आणि यासाठी आपल्याला वानरसेना बनण्याची पात्रता निर्माण करायची आहे.