Menu Close

अमरावती : रामनवमीची शोभायात्रा शिस्तबद्ध होण्यासाठी श्रीराम सेनेकडून हिंदु जनजागृती समितीला निमंत्रण

राम सेनेचे राष्ट्रीय संंयोजक श्री. विजय दुुबे आणि अन्य

अमरावती : अमरावती शहरात श्रीराम सेनेच्या वतीने रामनवमीच्या दिवशी शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये हिंदु जनजागृती समितीप्रमाणे शिस्तीत शोभायात्रा निघावी याकरिता त्यांनी समितीच्या कार्यकर्त्यांना आयोजनात सहभागी होण्याचे निमंत्रण दिले होते. शोभायात्रा एका रांगेत काढणेे, वाहतुकीला अडथळा होऊ न देणे या प्रकारच्या सेवा समितीच्या कार्यकर्त्यांनी केल्या. या समवेतच समितीच्या स्वरक्षण प्रशिक्षणवर्गात येणार्‍या ६ युवतींनी लाठी-काठी, दंडसाखळी यांची ठिकठिकाणी प्रात्याक्षिके दाखवली. त्यामुळे शोभायात्रेत शौर्यजागरण होऊन उत्साह वाढला.

नागरिक आणि पोलीस यांनी दिलेला प्रतिसाद

  • हिंदु जनजागृती समितीचे कार्य शिस्तीत असते. आम्हालाही तुमचा काही त्रास होत नाही आणि लोकांना पुष्कळ चांगले वाटते. – उपस्थित पोलीस
  • ‘तुम्ही दाखवलेल्या प्रात्यक्षिकांमुळे शोभायात्रेत शोभा आली. आजच्या काळात मुलींसाठी हे कार्य फारच महत्त्वाचे आहे’, असे म्हणून एका मंदिरातील पुजार्‍यांनी समितीचा संपर्क क्रमांकही घेतला.
  • आम्हालाही तुमच्यासारखे प्रशिक्षण शिकायचे आहे. आमच्यासाठी प्रशिक्षणवर्ग चालू करा. – उपस्थित युवती
  • तुम्ही सहभाग घेतल्यामुळे आम्ही शिस्तीत आणि चांगली शोभायात्रा काढू शकलो. तुमच्या युवतींनी शौर्यजागरण केले, त्याचे आम्हाला पुष्कळ कौतुक वाटते. हिंदु जनजागृती समितीमुळे आम्हाला पुष्कळ काही शिकायला मिळते. – श्रीराम सेनेचे कार्यकर्ते

अमरावती शहरात एकूण ८ ठिकाणी रामनामाचा सामूहिक जप करण्यात आला आणि साकडे घालण्यात आले. त्यामध्ये एकूण ४०० हून अधिक रामभक्तांनी सहभाग घेतला.

जळगाव जिल्ह्यातील पाळधी, नांद्रा येथेही साकडे

जळगाव : नांद्रा आणि पाळधी येथील श्रीराम मंदिरात साकडे घालण्यात आले. पाळधी येथे साकडे घालून प्रभु श्रीरामाचा सामूहिक नामजप करण्यात आला.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *