राममंदिर उभारणीच्या कार्यात श्रीरामाचा आशीर्वाद मिळण्यासाठी सोलापूर जिल्ह्यासह विविध ठिकाणी सामूहिक श्रीराम नामजप, साकडे आणि पत्रलेखन
सोलापूर : येथे रामनवमीनिमित्त ठिकठिकाणी ‘श्रीरामनाम संकीर्तन’ अभियानाच्या अंतर्गत श्रीरामाचा सामूहिक नामजप आणि प्रार्थना करण्यात आली.
- सोलापूर येथील दाजी पेठ येथील राम मंदिर येथे श्रीरामाचा सामूहिक नामजप करण्यात आला, तसेच परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त त्यांना आयुरारोग्य लाभावे, यासाठी प्रार्थना करण्यात आली. या वेळी श्रीराम मंदिराचे अध्यक्ष श्री. भूपती सामलेटी, मंदिराचे सचिव श्री. दयानंद कोंडाबतीनी, धर्मप्रेमी श्री. मनोहर सामलेटी, श्री. बाबुराव मनगोळी यांसह अनेक भाविक उपस्थित होते.
विशेष
- या वेळी मंदिर समितीने ध्वनीक्षेपण यंत्रणा आणि बैठक व्यवस्था उपलब्ध करून दिली. त्यामुळे ध्वनीक्षेपकावर सामूहिक आरती आणि नामजप करण्यात आला.
- मंदिराचे अध्यक्ष आणि सचिव यांना हिंदु जनजागृती समितीचा हा उपक्रम पुष्कळ आवडला. ‘यापुढेही उपक्रम घेण्यास मंदिरात येऊ शकता’, असे त्यांनी सांगितले.
- सोलापूर येथील लष्कर भागातील राम मंदिरात साकडे आणि श्रीरामाचा सामूहिक नामजप करण्यात आला. या वेळी ३५ भाविक उपस्थित होते.
- पिलीव (जिल्हा सोलापूर) येथील राममंदिरात श्रीरामाला साकडे घालून सामूहिक नामजप करण्यात आला.
- फलटण (जिल्हा सातारा) येथील दादा महाराज मठ येथील श्रीराम मंदिरात श्रीरामरायाला साकडे घालून भाविकांनी श्रीरामाचा सामूहिक नामजप केला, तसेच सुंदरपूर (तालुका फलटण) येथील भैरवनाथ मंदिरात साकडे घालून सामूहिक नामजप केला.
- बार्शी (जिल्हा सोलापूर) येथील भगवंत मंदिर आणि श्रीराम मंदिर येथे सामूहिक नामजप आणि श्रीरामाला साकडे घालण्यात आले.
- धाराशिव येथे श्रीराम मंदिर आणि श्री. लेणेकर यांच्या घरी भाविकांनी श्रीरामाला साकडे घालून सामूहिक नामजप केला.
- चिंचोली (जिल्हा लातूर) येथील राम मंदिरात साकडे घालण्यात आले. या वेळी १०० भाविक उपस्थित होते.
- अकलूज (जिल्हा सोलापूर) येथील श्रीराम मंदिरात भाविकांनी सामूहिक नामजप केला आणि श्रीरामरायाला साकडे घातले. या वेळी ५० हून अधिक भाविक उपस्थित होते. या वेळी भाविकांनी सर्वोच्च न्यायालयाला राममंदिर लवकर होण्यासाठी उत्स्फूर्तपणे पत्रलेखन केले.